Russia: 'चिकनवर लागणार नाही आयात शुल्क', राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी पुतिन सरकारचा निर्णय

Vladimir Putin: रशियाचे युक्रेनशी दीड वर्षांहून अधिक काळ युद्ध सुरु आहे. दुसरीकडे मार्चमध्ये काही महिन्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.
Vladimir Putin
Vladimir PutinDainik Gomantak
Published on
Updated on

Vladimir Putin: रशियाचे युक्रेनशी दीड वर्षांहून अधिक काळ युद्ध सुरु आहे. दुसरीकडे मार्चमध्ये काही महिन्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. देशात महागाई वाढत आहे. गेल्या आठवड्यात एका पेन्शनधारकाने वस्तूंच्या वाढत्या किमतींबाबत तक्रार केली होती. यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांची माफी मागितली होती. आता देशात चिकनवर आयात शुल्क आकारले जाणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे.

'14000 टन फ्रोझन चिकनवरील आयात शुल्क रद्द'

रशिया पुढील वर्षभरात 140,000 टन फ्रोझन चिकनवरील आयात शुल्क माफ करेल, असे सरकारने शनिवारी सांगितले. जेणेकरुन देशांतर्गत पुरवठा वाढवून किमती कमी करता येतील. गेल्या आठवड्यात, एका पेन्शनधारकाने त्यांच्याकडे अंडी आणि चिकनच्या वाढत्या किमतींबद्दल टेलिव्हिजनवरील कार्यक्रमादरम्यान तक्रार केली होती. त्यानंतर पुतीन यांनी माफी मागितली होती.

Vladimir Putin
Egg Crisis In Russia: आयएम सॉरी! अंडी टंचाईपुढे पुतिन यांनी टेकले गुढगे, मागितली देशवासियांची माफी

अंड्याच्या किमतीत 50 टक्के वाढ

किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 1.2 अब्ज अंड्यांवरील आयात शुल्कात सूट दिली आहे. यंदा अंड्यांचे दर पन्नास टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. 18 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात अंड्याच्या किमती 4.62% आणि त्याआधीच्या आठवड्यात 4.55% वाढल्या, असे सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी सांगितले. वार्षिक चलनवाढ 7.4 टक्के आहे, जी मध्यवर्ती बँकेच्या चार टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com