स्कुबा डायव्हिंग करताना तरूणीचा विनयभंग; जबरदस्तीने केले किस; वाचा नेमके प्रकरण...

बाहेर आल्यानंतर पोलिसांनी केली 'ही' कारवाई
(Chinese girl forcefully kissed while Scuba Diving by Traine in Malaysia)
(Chinese girl forcefully kissed while Scuba Diving by Traine in Malaysia) Dainik Gomantak
Published on
Updated on

स्कूबा डायव्हिंगसाठी गेलेल्या 24 वर्षीय तरुणीचा डायव्हिंग इन्स्ट्रक्टरनेच विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ट्रेनरने समुद्रात या तरूणीचा विनयभंग केला. तिला जबरदस्तीने किस केले, असे तरूणीने म्हटले आहे. दरम्यान, तरूणीच्या तक्रारीनंतर संबंधित ट्रेनरला अटक करण्यात आली आहे.

(Chinese girl forcefully kissed while Scuba Diving by Traine in Malaysia)

मलेशियातील सबाह राज्यात ही घटना घडली आहे. ही तरूणी चीनची असून ती मलेशियात पर्यटनासाठी आली होती. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ही तरूणी सबाहच्या सेम्पोर्ना टाउनमध्ये स्कूबा डायव्हिंगसाठी गेली होती.

सुरक्षेसाठी तिच्यासोबत एक प्रशिक्षक देखील होता. दरम्यान, ट्रेनरने समुद्रात पाण्याखाली गेल्यावर तरूणीशी गैरवर्तन केले. त्याने पाण्यात या तरूणीचे जबरदस्तीने चुंबन घेतले.

(Chinese girl forcefully kissed while Scuba Diving by Traine in Malaysia)
Imran Khan Arrest: नेमकं काय आहे अल-कादिर ट्रस्ट प्रकरण, ज्यात इम्रान खान अडकले; PM शरीफ...

ही घटना 5 मे रोजी घडली. चीनला परतण्यापूर्वी या युवतीने प्रशिक्षकाविरुद्ध मलेशिया पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. युवतीच्या म्हणण्यानुसार, ट्रेनरने पाण्याच्या आत गैरवर्तन केलेच पण नंतर बाहेर आल्यानंतरही त्याने तिच्यासोबत गैरवर्तन केले.

हा ट्रेनर सतत तिचा तिचा पाठलाग करत होता. तिच्या मोबाईलवर तो मेसेजही करत होता. तिची वैयक्तिक माहितीही त्याने जमवायला सुरवात केली होती. ट्रेनरच्या या कृत्यांना घाबरून तिने पोलिसात जाऊन तक्रार दिली.

सध्या पोलिसांनी प्रशिक्षकाविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

(Chinese girl forcefully kissed while Scuba Diving by Traine in Malaysia)
Pakistan Political Crisis: पाकिस्तानचे 'स्वित्झर्लंड' तालिबान्यांच्या ताब्यात, आता येथे उभारणार दहशतवादी कॅम्प; दशकभर...

दरम्यान, सबाह राज्याचे पर्यटन मंत्री क्रिस्टीन ल्यू यांनी या घटनेविषयी 'खेदजनक' अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. या तरूणीसोबत घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पर्यटनस्थळी असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, या घटनेमुळे राज्याच्या पर्यटन उद्योगाची प्रतिमा खराब झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेबाबत चिनी सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com