UNGA मध्ये बायडन यांचा भारताला पाठिंबा, तर पाकिस्तानला खडेबोल

बायडन यांचे पूर्ववर्ती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विपरीत, त्यांनी चीन आणि रशियासोबत वाढता तणाव कमी करण्याचा संदेशही दिला.
Joe Biden
Joe BidenDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला (UNGA) संबोधित केले. त्यांनी त्यामध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे चित्र स्पष्ट केले आहे. चीनची सर्वात मोठी चिंता त्यांच्या भाषणात दिसून आली. ते म्हणाले की, अमेरिका यापुढे दुसऱ्या शीतयुद्धाचे कारण होणार नाही. बायडन यांचे पूर्ववर्ती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विपरीत, त्यांनी चीन आणि रशियासोबत वाढता तणाव कमी करण्याचा संदेशही दिला. बायडन यांनी कोरोनाचा वाढता प्रकोप, दहशतवाद (Terrorism), अफगाणिस्तान (Afghanistan) आणि इराणबाबतचे त्यांचे धोरण स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तान मुद्द्यावर देशाच्या नाराजीचा सामना करणाऱ्या बायडन यांनी अमेरिकेचे धोरण स्पष्ट केले. बायडन यांच्या भाषणाचे काय परिणाम होणार होतील हे समजून घेऊया.

बायडन यांच्या भाषणावर रशिया आणि चीनची नजर

प्रो. हर्ष व्ही पंत म्हणतात की, प्रत्येकजण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणाची वाट पाहत होता. रशिया आणि चीनचेही डोळे त्यांच्या भाषणाकडे लागले होते. ते म्हणाले की बायडन यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा अजेंडा एक प्रकारे निश्चित केला आहे. तसेच बायडन यांनी जगातील सध्याचे सर्व ज्वलंत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी बायडन प्रशासनासाठी चिंतेच्या सर्व बाबींचा स्पर्श केला आहे.

Joe Biden
'अमेरिकेवर हल्ला कराल तर...' संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जो बायडन यांचा इशारा

बायडन यांचे परराष्ट्र धोरण हे ट्रम्प यांच्या उलट

प्रो. पंत म्हणाले की, बायडन यांचे परराष्ट्र धोरण त्यांचे पूर्ववर्ती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे आक्रमक नाही. त्यात एक प्रकारची उदारता आहे. ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण शत्रूला मुत्सद्दी आणि सामरिकदृष्ट्या घेराव घालण्यावर केंद्रित होते. मग ते इराण, रशिया किंवा चीन असो. ट्रम्प यांचे धोरण या देशांबाबत आक्रमक आहे. ते म्हणाले की, नव्या शीतयुद्धाचा संदर्भ देऊन बायडन यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांना चीनशी कोणत्याही संघर्षाची तयारी करायची नाही. त्यांचा मुद्दा चीनशी संवाद किंवा मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याच्या दिशेने आहे.

दरम्यान, प्रो. पंत म्हणाले की, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी बायडन यांनी त्यांच्या परराष्ट्र धोरणाकडे लक्ष वेधत चीनशी त्यांचे सामान्य संबंध असतील असे सांगितले होते. मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातून समस्या सोडवल्या जातील. बायडन त्यांच्या धोरणाव कायम आहेत. यानंतर बायडन यांनी चीनला आव्हान देणारे असे कोणतेही पाऊल उचलले नाही. शिवाय, बायडन म्हणाले की, आम्हाला जगाचे विभाजन करायचे नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत नव्या शीतयुद्धाला प्रोत्साहन देणार नाही.

Joe Biden
नैसर्गिक आपत्तीनं अमेरिकेला घेरलं, बायडन म्हणाले....

शिवाय, प्रो. पंत म्हणतात की बायडन यांनी इराणच्या बाबतीत उदारमतवादी दृष्टीकोनही स्वीकारला आहे. तथापि, राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी जोर देत म्हटले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्रधारी देश बनू देणार नाहीत. प्रो. पंत पुढे म्हणतात की, जेव्हा बायडन आपल्या भाषणात इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे सांगतात, तेव्हा ते अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या मूलभूत नियमांचे पालन करताना दिसतात. इराणच्या बाबतीत ट्रम्प यांचे धोरण अतिशय आक्रमक होते. बायडन यांना इराणच्या धर्तीवर कोरियन द्वीपकल्पाच्या समस्येवर तोडगा हवा आहे. कोरियन द्वीपकल्पातील कोणताही वाद त्यांना टाळायचा आहे. त्यांनी आपल्या भाषणात असे सूचित केले आहे की, समस्या सोडवण्यासाठी कूटनीतिच्या माध्यमातून शांतता हवी आहे.

दहशतवादावर लक्ष केंद्रित करा

जगात पुन्हा एकदा फोफावणाऱ्या दहशतवादाविरोधात बायडन यांचे कठोर धोरण दिसून आले. बायडन म्हणाले की, कोणत्याही बाबतीत दहशतवाद स्वीकारला जाणार नाही. पाकिस्तानचे नाव न घेता त्यांनी दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशांना सावध केले. पंत म्हणाले की, बायडन यांची ही भूमिका भारताच्या हिताची आहे. बायडन यांनी स्पष्ट केले की, जे दहशतवादाचा अवलंब करतात ते आमचे सर्वात मोठे शत्रू असतील. पंत म्हणाले की, बायडन पाकिस्तानकडे बोट दाखवत होते, जरी त्यांनी मंचावरुन त्यांचे नाव घेतले नाही.

Joe Biden
अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा निर्णय योग्यच:जो बायडन

अफगाणिस्तानचा मुद्दा युद्ध नव्हे तर मुत्सद्देगिरीने सोडवला जाईल

प्रो. पंत म्हणाले की, अमेरिकन नागरिकांनाही अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याबाबत बायडन यांच्या भाषणाची वाट पाहिली असावी. आता ते अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांचा बळी देऊ शकत नाहीत. प्रो. पंत म्हणाले की, आता अफगाणिस्तानच्या समस्येवर तोडगा युद्धाऐवजी मुत्सद्देगिरीद्वारे असेल. बायडन यांच्या भाषणातून हे स्पष्ट झाले आहे की, अमेरिकेची लष्करी शक्ती हा त्याचा पहिला पर्याय असावा. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर बायडन म्हणाले की, अमेरिका आज दहशतवादाशी लढत आहे. अफगाणिस्तानमधील 20 वर्षांचा संघर्ष संपवला आहे. हे युद्ध बंद करून आम्ही मुत्सद्देगिरीचे नवे दरवाजे उघडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com