‘या’ देशाच्या सरकारनं बनवलं शादी ॲप; लोकसंख्या वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

Japan Government: जपानमधील घटता मॅरेज रेट आणि जन्मदर लक्षात घेऊन सरकार लवकरच ‘Tokyo Futari Story’ नावाचे ऑनलाइन ॲप आणि वेबसाइट सुरु करणार आहे.
Marriage
Marriage Dainik Gomantak

Japan Government Ready To Launch Marriage App: लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. लग्न आणि डेटिंगसाठी ॲप्सचा वापर करणे काही नवीन नाही. पण तुमच्या देशाच्या सरकारला तुम्ही लग्न करुन डेट करावे असे वाटत असेल तर? हे थोडं विचित्र वाटतंय ना, पण जपान सरकार असा विचार करतयं. जपानमधील घटता मॅरेज रेट आणि जन्मदर लक्षात घेऊन सरकार लवकरच ‘Tokyo Futari Story’ नावाचे ऑनलाइन ॲप आणि वेबसाइट सुरु करणार आहे.

पारंपारिक विवाहावर लोकांचा विश्वास नाही

जपानमधील सध्याचा मॅरेज रेट आतापर्यंतचा सर्वात कमी आहे. जपान मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये जपानमध्ये 5,04,930 विवाह झाले. मात्र, 2023 मध्ये ही संख्या घटून 4,74,717 झाली. यावरुन स्पष्ट होते की, जपानी नागरिक लग्न करण्यात रस दाखवत नाहीत. देशात सध्या लोक एकटेपणाचे शिकार ठरत आहेत.

Marriage
Naked Man Festival in Japan: जपानच्या 'नेकेड मॅन' महोत्सवात आता महिलाही सहभागी होणार; 1,250 वर्षांत प्रथमच निर्णय

जन्मदर कमी होण्याचे कारण-

जपानमधील जन्मदर 7,70,759 वरुन 7,27,277 वर घसरला आहे. कारण जपानमध्ये मुलांचे संगोपन करणे खूप महागडे आहे. त्याचवेळी, ऑफिसमध्ये काम करताना इतका वेळ जातो की लोकांकडे त्यांच्या कुटुंबासाठी वेळच उरत नाही.

Marriage
Japan ban Upskirting: जपानमध्ये स्कर्टमधील महिलेचे फोटो काढाल तर मानला जाईल बलात्कार; काय आहे प्रकरण घ्या जाणून...

जपानला सध्या मजुरांच्या टंचाईसारख्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी ही परिस्थिती देशासाठी एक गंभीर संकट असल्याचे म्हटले आहे. तथापि, प्रेमाशी संबंधित सल्ला देणारी वेबसाइट जपानमध्ये आधीपासूनच कार्यरत आहे. जपान सरकारच्या ‘Tokyo Futari Story’ अर्थात 'दोन लोकांची गोष्ट' या उपक्रमाचे एक्सचे मालक एलन मस्क यांनी कौतुक केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com