'या' इस्लामिक देशात सुरु होतयं लिकर स्टोअर; इस्लाममध्ये दारु पिणे निषिद्ध असतानाही...

Saudi Arabia: ज्या देशात दारु पिण्याबाबत इतके कडक कायदे आहेत की, पकडले तर पाठीवर शेकडो फटके, हद्दपार किंवा तुरुंगवास अशी शिक्षा आहे.
Liquor Store
Liquor Store Dainik Gomantak
Published on
Updated on

Saudi Arabia: ज्या देशात दारु पिण्याबाबत इतके कडक कायदे आहेत की, पकडले तर पाठीवर शेकडो फटके, हद्दपार किंवा तुरुंगवास अशी शिक्षा आहे. तो इस्लामिक देश आपल्या देशात पहिले दारुचे स्टोअर उघडण्याच्या तयारीत आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये हे स्टोअर सुरु होणार आहे. हे स्टोअर विशेषत: गैर-मुस्लिम राजनयिकांसाठी खुले केले जात आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने याद्वारे इतर गैर-मुस्लिम स्थलांतरित देखील खरेदी करु शकतील की नाही याची पुष्टी केलेली नाही. परंतु, कागदपत्रांच्या आधारे लोकांना दुकानातून दारु मिळवण्यासाठी मोबाइल अॅपद्वारे नोंदणी करावी लागेल, परराष्ट्र मंत्रालयाकडून क्लिअरन्स कोड घ्यावा लागेल आणि दारुचा मासिक कोटाही मिळेल.

दरम्यान, इस्लाममध्ये दारु पिणे निषिद्ध असल्याने अति-पुराणमतवादी मुस्लिम देशात पर्यटन आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखालील प्रयत्नांमध्ये हे पाऊल मैलाचा दगड म्हणून पाहिले जात आहे. रॉयटर्सला मिळालेल्या कागदपत्रात असे म्हटले आहे की, हे दारुचे स्टोअर राजधानी रियाधच्या डिप्लोमॅटिक क्वार्टरमध्ये उघडले जाईल. जिथे दूतावास आणि राजनयिक अधिकारी राहतात.

तसेच, इतर गैर-मुस्लिम स्थलांतरितांना दारुच्या दुकानात खरेदी करण्याची परवानगी दिली जाईल की नाही हे स्पष्ट नाही. सौदी अरेबियामध्ये लाखो प्रवासी राहतात परंतु त्यापैकी बहुतेक आशिया आणि इजिप्तमधील मुस्लिम कामगार आहेत.

Liquor Store
Saudi Arabia: सौदी अरेबियाची चांदी! इस्लामच्या पवित्र शहर मक्कामध्ये सापडला सोन्याचा मोठा साठा

दारुसंबंधी कडक कायदा

सौदी अरेबियामध्ये दारु पिण्याविरोधात कडक कायदे आहेत. पकडल्यास फटके, हद्दपार, दंड किंवा कारावास अशा शिक्षेची तरतूद आहे. या कायद्यामुळे देशातील लोकांनाच नव्हे तर परदेशातील लोकांनाही शिक्षा झाली. त्यानंतरच्या सुधारणांचा भाग म्हणून, देशाच्या सरकारने फटके मारण्याच्या शिक्षेची जागा तुरुंगवासाच्या शिक्षेने बदलली.

Liquor Store
Saudi Arabia: सौदी अरेबियाने परदेशी कामगारांसाठी व्हिसा नियम केले कडक, भारतावरही होणार परिणाम?

दुसरीकडे, सौदी सरकारने या प्रकरणावर अद्याप कोणत्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही, परंतु राज्य-नियंत्रित माध्यमांनी असे वृत्त दिले आहे की सरकार राजनयिकांसाठी परदेशातून येणाऱ्या अल्कोहोलवर नवीन निर्बंध लादत आहे, ज्यामुळे नवीन स्टोअरची मागणी वाढू शकते. विशेष म्हणजे, प्रिन्स मोहम्मद यांची सत्तेवरील पकड मजबूत होण्यासोबतच सौदी अरेबियातही अनेक बदल घडून आले आहेत. यामध्ये देशाला गैर-धार्मिक पर्यटनासाठी खुले करणे, मैफिली आणि महिलांना वाहन चालवण्याची परवानगी देणे यांचा समावेश आहे. सौदी अरेबिया सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये 2030 पर्यंत स्थानिक उद्योग आणि लॉजिस्टिक केंद्रे विकसित करणे देखील समाविष्ट आहे. सौदी नागरिकांना लाखो नोकऱ्या उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com