Ibarhim Raisi Death: रईसी यांच्या मृत्यूवर लोकांनी आनंद केला साजरा, न्यूड फोटो केले पोस्ट; म्हणाले, ‘’मुक्त झालो...’’

Ibarhim Raisi Death Celebrate: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनानंतर इराणसह जगभरातील लोकांनी शोक व्यक्त केला.
Ibarhim Raisi Death
Ibarhim Raisi DeathDainik Gomantak
Published on
Updated on

Ibarhim Raisi Death Celebrate: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनानंतर इराणसह जगभरातील लोकांनी शोक व्यक्त केला. 30 लाखांहून अधिक लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. दुसरीरकडे मात्र, काही ठिकाणी रईसी यांच्या मृत्यूवर आनंद साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, आनंद साजरा करण्यासाठी काही लोकांसह महिलांनी न्यूड फोटोंचा आधार घेतला. सोशल मीडियावर न्यूड फोटो पोस्ट करण्यात आले. तर अनेकांनी रईसी यांचा नामोउल्लेख 'इराणचा कसाई' असा केला. आता हे लोक त्यांच्या मृत्यूनंतर आपण मुक्त झालो असल्याचा आनंद साजरा करत आहेत.

दरम्यान, हजारो महिला बुरख्यात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना दिसल्या. मृत्यूच्या बातमीनंतर काही इराणी महिला आणि पुरुषांनी आपले न्यूड फोटो पोस्ट करुन आनंद साजरा केला. यावर प्रतिक्रिया देताना राजकीय विश्लेषक हनीह झियाई यांनी सांगितले की, रईसी यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त करण्यासाठी न्यूड फोटो पोस्ट करणे म्हणजे त्यांना कोणत्यातरी जोखडातून मुक्त झाल्यासारखे वाटते.

Ibarhim Raisi Death
Iran President Ebrahim Raisi Death: अयातुल्ला खेमेनी यांचा उत्तराधिकारी काळाच्या पडद्याआड!

इराण इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार, नग्न होऊन रईसी यांच्या मृत्यूवर आनंद साजरा करण्याची कल्पना X वर एका इन्फ्लुएन्सरने केलेल्या ट्विटवरुन आली. त्याने रईसी यांच्या बेपत्ता होण्यावर ट्विट करत म्हटले होते की, जर रईसी यांचा मृत्यू झाला तर मी माझा न्यूड फोटो शेअर करेन. त्याने हे विनोद किंवा राजकीय अभिव्यक्ती म्हणून सांगितले हे माहित नाही, परंतु त्यानंतर हजारो इराणी लोक त्याच्या या मोहिमेत सामील झाले आणि त्यांनी न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

Ibarhim Raisi Death
Iran President Ebrahim Raisi Death: ‘’तेहरानचा कसाई...’’, इराणी राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या मृत्यूवर इस्रायली मीडियाची आगपाखड!

"नग्नता हे नेहमीच निषेधाचे प्रतीक राहिले"

सोशल मीडियावरील आंदोलनावर लक्ष ठेवणारे सियावश रोकनी यांनी इराण इंटरनॅशनलशी बोलताना सांगितले की, इराणमध्ये महिला आणि पुरुष दोघांनाही जबरदस्तीने त्यांचे शरीर झाकण्यास सांगितले जाते. विशेष म्हणजे असे न करणाऱ्यांची तुरुंगात रुवानगी होते. ते पुढे म्हणाले की, नग्नता हे नेहमीच निषेधाचे प्रतिक राहिले आहे. 1960 आणि 70 च्या दशकातील युद्धविरोधी चळवळ हिप्पी प्रोटेस्टमध्येही नग्न होऊन निषेध व्यक्त करण्यात आला होता. स्त्रीवादी चळवळींमध्ये महिलांनी अनेकदा आपल्या हक्कांसाठी नग्नतेचा हत्यार म्हणून केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com