Iran President Ebrahim Raisi Death: अयातुल्ला खेमेनी यांचा उत्तराधिकारी काळाच्या पडद्याआड!

Manish Jadhav

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा अपघात

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळल्याच्या वृत्ताने जगभरात एकच खळबळ उडाली. रईसी यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे संकेत मिळत होते परंतु त्याची पुष्टी झाली नव्हती.

Iran President Ebrahim Raisi Death | Dainik Gomantak

इब्राहिम रईसी यांचा मृत्यू

इराणच्या सरकारी माध्यमांनी आज पुष्टी केली की, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे. या अपघातात रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्री आणि गव्हर्नर यांचा मृत्यू झाला.

Iran President Ebrahim Raisi Death | Dainik Gomantak

खेमेनी यांचे उत्तराधिकारी मानले जात होते

राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचे उत्तराधिकारी मानले जात होते.

Iran President Ebrahim Raisi Death | Dainik Gomantak

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी कोण होते?

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा जन्म 1960 मध्ये ईशान्य इराणमधील मशहद शहरात झाला. रईसी यांचे वडील मौलवी होते, पण रईसी अवघ्या पाच वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले.

Iran President Ebrahim Raisi Death | Dainik Gomantak

रईसी यांच कल धर्म आणि राजकारणाकडे होता

रईसी यांचा सुरुवातीपासूनच धर्म आणि राजकारणाकडे कल होता. विद्यार्थीदशेतच ते मोहम्मद रजा शाह यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. रजा शाह हे पाश्चात्य देशांचे समर्थक मानले जात होते.

Iran President Ebrahim Raisi Death | Dainik Gomantak

वयाच्या 15 व्या वर्षी अभ्यासाला सुरुवात केली

लहान वयातच ते उच्च पदावर पोहोचले. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी कोम शहरात असलेल्या शिया संस्थेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

Iran President Ebrahim Raisi Death | Dainik Gomantak

1979 मध्ये इस्लामिक क्रांती

विद्यार्थीदशेत त्यांनी मोहम्मद रझा शाह यांच्या विरोधात पाश्चात्य देशांनी पाठिंबा दिलेल्या निदर्शनांमध्ये भाग घेतला. पुढे अयातुल्ला रुहोल्ला खेमेनी यांनी 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीच्या माध्यमातून शाह यांना सत्तेवरुन हटवले.

Iran President Ebrahim Raisi Death | Dainik Gomantak

वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी...

वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी, तेहरानजवळील काराजचे अभियोजक जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. रईसी 1989 ते 1994 दरम्यान तेहरानचे अभियोजक जनरल होते आणि त्यानंतर 2004 पासून पुढील दशकासाठी न्यायिक प्राधिकरणाचे उपप्रमुख होते.

Iran President Ebrahim Raisi Death | Dainik Gomantak

इराणचे कट्टरतावादी नेते म्हणून ओळख

रईसी यांची ओळख इराणचे कट्टरतावादी नेते म्हणून होती. तसेच, देशाचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खेमेनी यांच्या जवळचे मानले जात होते.

Iran President Ebrahim Raisi Death | Dainik Gomantak

रईसी इस्लामिक रिपब्लिकचे अध्यक्ष बनले

जून 2021 मध्ये रईसी इराणच्या इस्लामिक रिपब्लिकचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, त्यांनी उदारवादी हसन रुहानी यांची जागा घेतली होती.

Iran President Ebrahim Raisi Death | Dainik Gomantak
Slovakia PM Robert Fico | Dainik Gomantak