गोव्यातील सापांची माहिती नॅशनल जिओग्राफीकवर

नॅशनल जिओग्राफीकवर (National Geographic) लोकांना गोव्यात (Goa) असणाऱ्या सापांच्या विविध प्रजातींची माहितीही मिळू शकेल.
Snakes  SOS: Goa's  Wildest
Snakes SOS: Goa's WildestDainik Gomantak
Published on
Updated on

बेनहिल आंताव सांगत होता, ‘कधी कधी मला रात्री फार उशीरा फोन येतो. फोनवरचा माणूस सांगत असतो, की त्याला झोप येत नाही. कारण विचारल्यावर फोनवरचा माणूस सांगतो, की तो एका सापाला दुखवून आला आहे. तो साप (Snake) आपल्या मागावर तर नसेल?’

बेनहिल सांगतो, सापाविषयीच्या अशा गैरसमजानी, मिथकानी आपल्यापैकी अनेकांना घेरून टाकले आहे. या अशा गैरसमजापोटी आपण सापांबरोबर वैर पत्करून त्यांना मारत आलो आहोत. आता अगदी अलीकडच्या काळात हे गैरसमज दूर होत चालले आहेत मात्र सर्प कुळातील या जीवांबद्दल अजूनही लोकांच्या मनात गुढ अशा भीतीदायक भावना दाटून आहेत.

Snakes  SOS: Goa's  Wildest
Snakes SOS: Goa's WildestDainik Gomantak

बेनहिल आंताव आणि लुईसा रेमेडीएस या दाम्पत्यावर चित्रित केलेला ‘स्नेक एसओएस: गोवाज वाईल्डनेस्ट’ या (Snakes SOS: Goa's Wildest) मालिकेचे प्रक्षेपण कालपासून नॅशनल जिओग्राफीक (National Geographic) वाहिनीवरून दाखवण्यात सुरुवात झाली आहे. दहा भागांची ही मालिका दर सोमवार आणि मंगळवार रात्री 8 वाजता पुढचे पाच आठवडे चालू राहील.

Snakes  SOS: Goa's  Wildest
Science Miracle: मानवी शरीरात धडकणार डुकराचे हृदय

बेनहिल आणि लुईसा (Louisa) हे दोघे वन्यप्राण्यांच्या सुटकेसाठी काम करतात. साप आणि मगरी यांच्या सुटकेसाठी त्यांना सातत्याने फोन येत असतात. लुईसा सांगते, आपल्याला आपल्या भागातल्या वन्यजीवांबद्दल नीट माहिती नसणे हे आपले सर्वात मोठे दुर्दैव आहे. साप (Snake) तर इतर प्राण्यांसारखे साधारण असतात पण त्यांच्याबद्दल निर्माण झालेला भयगंड हा आपल्या मनात त्यांच्याविषयी लहानपणापासून पेरलेल्या भीतीचा परिपाक आहे. त्यांच्याबद्दल असलेल्या अज्ञानापासून या भितीची निर्मिती झाली आहे. बेनहिलच्या मते, साप दिसला तर आपण त्याच्यापासून दूर पळता कामा नये किंवा आपण त्यांना मारतानाही कामा नये. सुरक्षित अंतर राखून आपण त्यांच्याकडे कौतुकपूर्ण नजरेनेच पाहिले पाहिजे.

लोकांना आपल्या जंगलाची (Forest) त्यातल्या वन्यजीवांची माहिती करून देणे हेदेखील या मालिकेचे उद्दिष्ट आहे. या मालिकेची निर्मिती ‘रिव्हरबँक स्टुडिओज’ या निर्मितीसंस्थेनेकडून झाली आहे. ‘रिव्हरबँक स्टुडिओ’ (Riverbank Studios) हे वन्यजीव संवर्धनाच्या विषयावर फिल्म (Film) बनवत असते. त्यांनी बेनहिलकडे ऑनलाइन जागृतता कार्यक्रमाविषयी विचारणा केली होती. नॅशनल जिओग्राफिक वाहिनी ही ‘रिव्हरबॅक स्टुडिओ’कडून अनेक कार्यक्रम स्वीकारत असते. बेनहिल आणि लुईसावर चित्रित झालेला हा कार्यक्रम त्यांच्या पाहण्यात आला आणि ते प्रभावित झाले. आणि मग पुढील गोष्टी घडत गेल्या.

याआधी बेनहिल किंवा लुइसा या क्षेत्रात किती गेली कित्येक वर्षे असूनसुद्धा (बेनहिल आपल्या वयाच्या 13-14 वर्षापासून सापांना अभय देण्याचे काम करतो तर त्याची पत्नी लुईसा, जिला तो दहा वर्षांपूर्वीच भेटला, लग्नानंतर त्याला साथ देते आहे) त्यांनी कधी सापांची सुटका करताना, साध्या युट्युबसाठी (You Tube) देखील कधी आपल्या फोनवर चित्रण केले नव्हते. मात्र आता चक्क नॅशनल जिओग्राफिक वाहिनीसाठी चित्रण करणे हे त्यांच्यासाठी आनंदाचे होते. आनंदाचे अशासाठीही की त्यामुळे लोकांना गोव्यात (Goa) असणाऱ्या सापांच्या विविध प्रजातींची माहितीही मिळू शकेल. बेनहिल (Benhill) आणि लुईसाला वाटते की त्यामुळे लोकांच्या मनातले सापाबद्दलचे (आणि इतर वन्यजीवांबद्दलचेही) गैरसमज दूर व्हायला मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com