Indonesia: जगातील अनेक देशांमध्ये लोकशाही आहे. लोकांना त्यांच्या अटींवर जीवन जगण्याचा अधिकार आहे. भारतातही अभिव्यक्ती, धर्म निवडण्याचे, कुठेही राहण्याचे आणि कोणाशीही लग्न करण्याचे स्वातंत्र्य आहे.
पण काही देशांमध्ये छोट्याशा चुकीसाठीही कठोर शिक्षा दिली जाते. या देशांमध्ये इंडोनेशियाचाही समावेश होतो. नुकतेच इंडोनेशियामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
दरम्यान, इंडोनेशियात (Indonesia) एका कारमध्ये एक अविवाहित जोडपे किस करताना आढळले. पण यानंतर त्यांना अशी शिक्षा देण्यात आली, जे ऐकून सगळेच अवाक् झाले. पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये जोडपे किस करत होते.
तेव्हाच प्रशासनातील लोकांनी त्यांना हे करताना पाहिले. यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कठोर शिक्षा देण्यात आली. दोघांनाही सर्वांसमोर 21-21 फटके मारण्यात आले. यापूर्वी, 25 फटके मारण्याची शिक्षा होती.
सिंडो न्यूजच्या रिपोर्टनुसार, मुलाचे वय 24 वर्षे आणि मुलीचे वय 23 वर्षे आहे. सुमात्रा बेटावरील बुस्तानुल सलाटिन कॉम्प्लेक्समध्ये त्यांना 21-21 चा फटके मारण्यात आले.
या जोडप्याला सर्वांसमोर ही शिक्षा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सुरुवातीला त्यांना 25-25 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण नंतर ते 21 फटके करण्यात आले.
दुसरीकडे, त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. फटके मारल्यानंतर मुलगी वेदनेने विव्हळत जमिनीवर पडते. बांदा आचे प्रॉसिक्यूटरच्या म्हणण्यानुसार, या जोडप्याने जिनायत कायद्याशी संबंधित 2014 च्या आचे कायदा क्रमांक 6 च्या कलम 25 मधील परिच्छेद-1 चे उल्लंघन केले आहे. त्याचा संबंध विवेकाशी आहे.
कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण इंडोनेशियामध्ये लग्नाआधी कोणी किस करताना किंवा सेक्स करताना आढळल्यास, त्याला कठोर शिक्षा दिली जाते. मात्र, याआधीही जोडप्यांना भयानक शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.