Indiscriminate shooting at university in Prague, Czech Republic, kills 15, including attacker:
झेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथील एका विद्यापीठात सामूहिक गोळीबार झाल्याची बातमी आहे. या घटनेत हल्लेखोरासह 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे दोन डझन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ही घटना घडवणारा हल्लेखोरही ठार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रागमधील चार्ल्स विद्यापीठाच्या कला शाखेत सामूहिक गोळीबाराची ही घटना घडली. चेक प्रजासत्ताकचे गृहमंत्री विट रकुसन यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, ज्याने गोळीबार केला तो ठार झाला आहे. घटनास्थळी अन्य कोणी हल्लेखोर नसल्याची पुष्टी झाली आहे.
या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. स्थानिकांना या भागात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्राग गोळीबाराच्या या घटनेचा दहशतवादाशी संबंध नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. चेक प्रजासत्ताकच्या इतिहासातील सर्वात वाईट सामूहिक गोळीबार असे त्याचे वर्णन केले जात आहे.
पोलीस प्रमुख मार्टिन वोंड्रासेक म्हणाले की, अधिकाऱ्यांना आदल्या दिवशी माहिती मिळाली होती की हा माणूस राजधानीच्या बाहेरील क्लाडनो प्रदेशातील त्याच्या शहरातून प्रागला जात होता, शक्यतो स्वतःचा जीव घेण्याच्या उद्देशाने. त्यानंतर काही वेळातच शूटरचे वडील मृतावस्थेत आढळले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.