मार्कोस कमांडोची यशस्वी मोहीम; समुद्री चाच्यांनी हायजॅक केलेल्या जहाजातून 15 भारतीयांची सुखरुप सुटका

MV Lila Norfolk Hijacked: सोमालिया किनार्‍याजवळ अपहरण करण्यात आलेल्या एमव्ही लिला नॉरफोक जहाजावरील सर्व 15 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे.
indian naval warship ins chennai
indian naval warship ins chennai Dainik Gomantak

MV Lili Norfolk: सोमालिया किनार्‍याजवळ अपहरण करण्यात आलेल्या एमव्ही लिली नॉरफोक जहाजावरील सर्व 15 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. याशिवाय, भारतीय नौदलाने सहा क्रू मेंबर्सचीही सुटका केली आहे. सर्व 21 लोक क्रू मेंबर आहेत. नौदलाने एमव्ही लिली नॉरफोकच्या अपहरणानंतर शोधण्यासाठी युद्धनौका, सागरी गस्ती विमान P-8I आणि लांब पल्ल्याच्या 'प्रिडेटर MQ9B ड्रोन' तैनात केले होते.

जहाजावरील सर्व भारतीय सुरक्षित

दरम्यान, अपहरण झालेल्या एमव्ही लिली नॉरफोक या जहाजावरील 15 भारतीय आणि सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय नौदलाचे सागरी कमांडो जहाजाचे इतर भागही क्लियर करत आहेत. भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी अरबी समुद्रात कार्यरत असलेल्या भारतीय युद्धनौकांना चाच्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागातील व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले टाळण्यासाठी भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, मार्कोस ऑपरेशनसाठी मरीन कमांडोज पोहोचले होते. भारतीय युद्धनौकेने आपले हेलिकॉप्टर उतरवले आणि लुटलेले जहाज सोडण्याचे आवाहन चाच्यांना केले होते.

indian naval warship ins chennai
Israel-Hamas War: ''जिथे संधी मिळेल तिथे बदला घेऊ''; लेबनॉन आणि इराणमधील भीषण हल्ल्यांदरम्यान इस्रायलची धमकी

जहाजावर लायबेरियाचा झेंडा होता

भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एमव्ही लीली नॉरफोक' या जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती गुरुवारी संध्याकाळी मिळाली होती. सोमालियाच्या किनाऱ्यावर अपहरण करण्यात आलेल्या या जहाजावर लायबेरियाचा झेंडा होता. भारतीय नौदलाची विमाने या जहाजावर सतत लक्ष ठेवून होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com