Comet Moving To Earth: वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येतोय 'K2' धूमकेतू ! फक्त 11 दिवस बाकी

14 जुलै रोजी धुमकेतु पृथ्वीच्या अगदी जवळ पोहोचेल, त्यामुळे ते पृथ्वीला हानी पोहोचवू शकते की नाही हे जाणून घेऊया.
Comet moving to Earth
Comet moving to EarthDainik Gomantak

आतापर्यंत पाहिलेला सर्वात सक्रिय धूमकेतू 14 जुलै रोजी पृथ्वीच्या सर्वात जवळ पोहोचणार आहे. या धूमकेतूला K2 असे नाव देण्यात आले आहे. ते 2017 मध्ये पहिल्यांदा दिसले होते, जे आता पृथ्वीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. पृथ्वीला किती धोका आहे ते जाणून घेऊया. (Comet Moving To Earth News)

* 2017 मध्ये प्रथम पाहिले

Space.com च्या रिपोर्टनुसार, 2017 मध्ये हा धूमकेतू पहिल्यांदा दिसला होता. तेव्हा त्याचे नाव K2 ठेवण्यात आले होते. 14 जुलै रोजी जेव्हा तो आपल्या ग्रहाच्या सर्वात जवळ येईल तेव्हा धूमकेतू (Comet) पृथ्वीपासून सुमारे 168 दशलक्ष मैल (270 दशलक्ष किलोमीटर) दूर असेल.

Comet moving to Earth
इम्रान खानची पत्नी बुशरा बीबी यांचा देशविरोधी हॅशटॅग चालवण्याची सूचना देणारा खळबळजनक ऑडिओ लीक

* ऑनलाइन पाहू शकता धूमकेतू

व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रकल्पाच्या थेट वेबकास्टमध्ये ट्यून करून लोक संध्याकाळी 6:15 पासून ते ऑनलाइन (Online) पाहू शकतील. हा धूमकेतू गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पृथ्वीच्या (Earth) दिशेने सरकत आहे. धूमकेतू, जे बहुतेक गोठलेले वायू, खडक आणि धूळ यांचे बनलेले असतात. ते सूर्याजवळ येताच सक्रिय होतात. सूर्याची उष्णता धूमकेतूला खूप लवकर गरम करते, ज्यामुळे त्याचा घन बर्फ थेट वायूमध्ये बदलतो आणि धूमकेतूभोवती एक ढग तयार होतो, ज्याला कोमा म्हणतात.

* हा धूमकेतू आधीच सक्रिय होता

विशेष म्हणजे, सूर्यापासून सुमारे 1.49 अब्ज मैल (2.4 अब्ज किमी) अंतरावर असलेल्या शनि आणि युरेनसच्या कक्षेदरम्यान 2017 मध्ये प्रथम शोधला गेला. तेव्हा K2 आधीच सक्रिय होता. या धूमकेतूमध्ये प्रचंड कोमा असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅनडा-फ्रान्स-हवाई टेलिस्कोप (CFHT) ने सुचवले की K2 चे केंद्रक 18 ते 100 मैल (30 ते 160 किमी) रुंद असू शकते.

* सतत सौर यंत्रणेकडे वाटचाल

हा धूमकेतू जसजसा सौरमालेकडे सरकत आहे, तसतसा तो वेगवान होत आहे. 14 जुलै रोजी, हा धूमकेतू 8 किंवा 7 च्या तीव्रतेपर्यंत उजळण्याची अपेक्षा आहे. अद्याप ते पाहता येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com