Halle Berry: हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा कहर, बाल्कनीत वाइन पितानाचा 'न्यूड फोटो' स्वत:च केला शेअर

अभिनेत्रीचा 'न्यूड फोटो' सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला असून, तुफान व्हायरल होत आहे.
Hollywood Actress Halle Berry
Hollywood Actress Halle BerryDainik Gomantak

Hollywood Actress Halle Berry: हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वत:चा वाइन पितानाचा 'न्यूड फोटो' सोशल मिडियावर शेअर केला आहे. या अभिनेत्रीने 'मला जे करायचे आहे ते करायला आवडते' असे फोटो कॅप्शन देखील या फोटोसाठी दिले आहे.

अभिनेत्रीचा 'न्यूड फोटो' सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला असून, तुफान व्हायरल होत आहे. यावरून लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत.

(Hollywood Actress Halle Berry shared her nude photo of drinking wine on balcony)

हॅले बेरी असे 56 वर्षीय हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव आहे. हॅलेने शनिवारी (8 एप्रिल) इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर तिचा न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोत हॅले बाल्कनीच्या रेलिंगवर झुकलेली ग्लासमधून वाइन पिताना दिसत आहे.

हॅले बेरी हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री असून, तिने कॅट वूमन, मॉन्टर बॉल, जॉन विक चॅप्टर-3, द कॉल, स्वॉर्डफिश आणि मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या मूनफॉल या चित्रपटात काम केले आहे.

दरम्यान, या फोटोवरून अभिनेत्रीवर टीका देखील होत असून, या टीकेवर देखील तिने उत्तर दिले आहे.

Hollywood Actress Halle Berry
Anupam Kher's Mother On PM Modi : अनुपम खेर यांच्या आईकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक म्हणाल्या...व्हिडीओ व्हायरल...

हॅलेने शेअर केलेल्या तिच्या ट्विटरवरील फोटोवर एकाने मला भविष्यात प्रेरणा मिळावी यासाठी मी “व्हिजन बोर्ड” म्हणून हे ट्विट सेव्ह केले आहे. अशा शब्दार प्रतिक्रिया दिली आहे.

वयाच्या पन्नाशीसाठी मी हे ट्विट सेव्ह करून ठेवतो असे आणखी एकाने ट्विट केलयं. तसेच, एकाने उन्हाळ्यात प्रेरणा मिळावी म्हणून हा फोटो “व्हिजन बोर्ड” म्हणून सेव्ह केलाय. अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे.

दरम्यान, अशात हॅलेचे अनेक चाहते तिच्या समर्थनात उतरले असून, त्यांनी हॅलेच्या कृतीचे समर्थन केले आहे.

'मला माहिती आहे हे योग्य आहे. तू असे काही करू शकतेस कारण तू त्यायोग्य मेहनत घेऊन स्वत:ला सिद्ध केले आहेस, मला अभिमान आहे तुझा.' अशी एका हॅलेच्या फॅनने प्रतिक्रिया दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com