भारतासोबतच्या तणावादरम्यान कॅनेडियन आर्मीची वेबसाईट हॅक, 'इंडियन सायबर फोर्स...'

India Canada Tension: भारत आणि कॅनडादरम्यान सुरु असलेल्या तणावादरम्यान हॅकर्संनी कॅनडियन लष्कराच्या वेबसाइटला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.
Hackers
Hackers Dainik Gomantak
Published on
Updated on

India Canada Tension: भारत आणि कॅनडादरम्यान सुरु असलेल्या तणावादरम्यान हॅकर्संनी कॅनडियन लष्कराच्या वेबसाइटला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. या हॅकर्संनी स्वतःची ओळख इंडियन सायबर फोर्स अशी सांगितली आहे.

या गटाचा भारताशी कोणत्याही प्रकारे संबंध नसला तरी. या हॅकर्संनी टेलिग्रामवर हॅकिंगची माहिती दिली आहे. एक स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये कॅनडासाठी अपशब्द वापरण्यात आले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, हे डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस (DDoS) हॅकिंग आहे, ज्याद्वारे कॅनडाच्या सरकारला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. DDoS हॅकिंग खूप कमी कालावधीसाठी केले जाते. ते कधीकधी काही तास किंवा दिवसांसाठीच होते.

27 सप्टेंबरची घटना

दरम्यान, बऱ्याच वेळा हॅकिंग ग्रुप कोणतीही गंभीर हानी पोहोचवण्याऐवजी लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ही पद्धत वापरतात.

राष्ट्रीय संरक्षण विभागातील मीडिया संबंध प्रमुख डॅनियल ले बौथिलियर यांनी कॅनेडियन मीडियाला सांगितले की, बुधवारी (27 सप्टेंबर) दुपारच्या सुमारास समस्या सुरु झाली. नंतर ती दुरुस्त करण्यात आली.

बौथिलियरने अधिक तपशील दिलेला नसला तरी, ते म्हणाले की, सिस्टमवर त्याचा परिणाम झाल्याचे कोणतेही संकेत आमच्याकडे नाहीत. कॅनेडियन सैन्याकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

ते नौदल, विशेष कमांड गट, हवाई आणि अंतराळ ऑपरेशन्ससह कॅनडासाठी सर्व लष्करी ऑपरेशन्सचे प्रतिनिधित्व करतात.

Hackers
Canada India Tension: कॅनडा किंवा भारत यापैकी जर एकाला निवडायचे असेल तर अमेरिका नक्कीच 'या' देशासोबत असेल...

आठवड्यापूर्वी मेसेज दिला

या हॅकिंगसंबंधी आठवडाभरापूर्वी ग्रुपने एक मेसेज दिला होता. त्यांनी ट्विट केले होते की, कॅनडाच्या (Canada) सायबर स्पेसमध्ये भारतीय सायबर दलाच्या हल्ल्याची ताकद अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. हे तुम्ही सुरु केलेल्या गोंधळासाठी आहे.

ट्रूडो यांनी संसदेच्या तातडीच्या अधिवेशनाला संबोधित केल्यावर भारत आणि कॅनडामधील राजनैतिक वादाला तोंड फुटले.

यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या सरकारकडे (Government) खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर यांची नवी दिल्लीतील एजंटांनी हत्या केल्याचा विश्वासार्ह पुरावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com