Balochistan Blast: बलुचिस्तानमध्ये चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर हल्ला, 4 चिनी नागरिक, 9 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू

या हल्ल्यात 4 चिनी नागरिक आणि 9 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
Balochistan Blast
Balochistan BlastDainik Gomantak
Published on
Updated on

Gwadar Balochistan Blast: पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये चिनी अभियंत्यांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर पाकिस्तानचे दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

ग्वादरमधील फकीर पुलावर आज (रविवारी) ही घटना घडली. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने घेतली आहे. या हल्ल्यात 4 चिनी नागरिक आणि 9 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्वादरमधील फकीर पुलावर चिनी अभियंत्यांना घेऊन जाणाऱ्या 7 वाहनांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी स्फोट आणि गोळीबार सुरू होता. या हल्ल्यानंतर ग्वादर हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून, कोणत्याही वाहनाला शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

'द बलुचिस्तान पोस्ट'च्या बातमीनुसार, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन फुटीरतावादी ठार झाले, तर इतर पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांना पकडण्यासाठी पाकिस्तानी लष्कर शोध मोहीम राबवत आहे. या हल्ल्याचे आणि चकमकीचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत.

Balochistan Blast
America: 09+10 = 21, अमेरिकेतील 21 वर्षीय हॅकरने सिद्ध केले 'एआय'ही चुकू शकतो

या हल्ल्यादरम्यान, पाकिस्तानमधील चिनी वाणिज्य दूतावासांनी बलुचिस्तान आणि सिंधमधील त्यांच्या नागरिकांना पुढील आदेश मिळेपर्यंत घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत.

चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेडने (आत्मघातकी पथक) स्वीकारली आहे. हल्ला अजूनही सुरूच आहे आणि पुढील माहिती नंतर जाहीर केली जाईल, असा बीएलएने दावा केला आहे. दरम्यान, चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ग्वादरमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका सुरूच आहे.

'द बलुचिस्तान पोस्ट'च्या म्हणण्यानुसार, सकाळी 9.30 वाजता चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला, दुपारी 2 वाजेपर्यंत हा हल्ला सुरू होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com