McAfee अँटीव्हायरसच्या संस्थापकाने का केली तुरुंगात आत्महत्या?

McAfee
McAfee

स्पेनमधील बार्सिलोना(Barcelona) येथील तुरूंगात McAfee एंटीवायरस सॉफ्टवेयरचा(McAfee antivirus software) निर्माता जॉन मॅकॅफी(John McAfee) मृत अवस्थेत आढळला आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आणि सांगितले की McAfee त्याच्या सेलमध्ये मृतावस्थेत सापडला आहे. सुरक्षा रक्षकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ते 75 वर्षांचे होते. विशेष म्हणजे काही तासापुर्वीच स्पेन न्यायालयाने त्यांना अमेरिकेत प्रत्यार्पण(Extradition) करण्याचा आदेश दिला होता. अमेरिकेत (America) जॉन मेकफली यांच्यावर टॅक्स चोरीचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात त्यांना कमीतकमी 30 वर्षांची शिक्षा होणार होती.(Founder of Antivirus John McAfee committed suicide in Spain prison)

स्थानिक कॅटलान सरकारने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर पूर्व स्पॅनिश शहरालगत असलेल्या ब्रायन 2 तुरुंगात सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. स्पेनच्या राष्ट्रीय कोर्टाने सोमवारी मॅकॅफीला अमेरिकेच्या ताब्यात देण्याच्या बाजूने निकाल दिला. या महिन्याच्या सुरुवातीच्या सुनावणीत मॅकॅफी यांनी आपल्यावर केलेले आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे न्यायालयात सांगितले. जर तो अमेरिकेत प्रत्यार्पणासाठी गेला तर त्याला उर्वरित आयुष्य तुरूंगात घालवावे लागेल. हा कोर्टाचा निर्णय बुधवारी जाहीर झाला. 

जॉन मॅकॅफीवर काय आरोप होते?
टेनेसी वकिलांनी मॅकॅफीवर कर चुकवल्याचा आरोप केला होता. त्यांनी सल्लामसलत कार्यादरम्यान क्रिप्टोकरन्सीस प्रोत्साहित करण्याच्या उत्पन्नाचा अहवाल दिला नाही म्हणून हा आरोप करण्यात आला. या व्यतिरिक्त मॅकॅफीने त्यांच्या जीवन कथेवर आधारित व्याख्यान आणि डॉक्युमेंटरीतून मिळणाऱ्या उत्पनाची माहिती दिली नाही. अशा गुन्हेगारी शुल्कामुळे 30 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जॉन मॅकॅफीला बार्सिलोना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com