
Earthquake in South Africa: दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर 5.0 होती. तर भूकंपाची खोली 10 किमी असल्याचे सांगण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार दुपारी 2.38 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता एवढी होती की तेथे असलेली अनेक घरे हादरू लागली.
या भूकंपाचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये भूकंपामुळे वेगाने थरथरणाऱ्या घराच्या बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज जोडलेले आहे. हे व्हिडीओ पाहून अंदाज बांधता येतो की भूकंप किती तीव्रता किती होती.
भूकंपाच्या धक्क्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला
स्थानिक रहिवाशांकडून नुकसान झालेल्या घरांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
भूकंपानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली आहेत. जोहान्सबर्ग आपत्कालीन सेवांच्या प्रवक्त्याने भूकंपानंतर सावध असल्याचे सांगितले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जोहान्सबर्गपासून 20 किमी पूर्वेला असलेल्या बोक्सबर्गमध्ये होता. जोहान्सबर्गच्या आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला
या भूकंपानंतर सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ (Video) आणि फोटो (Photo) शेअर केले जात आहेत. याआधी ऑगस्ट 2014 मध्ये 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
शेवटचा सर्वात मोठा भूकंप 6.3 रिश्टर स्केलचा 1969 साली झाला होता. आता येत्या काही दिवसांत जोहान्सबर्गमध्ये भूकंपाचे आणखी धक्के जाणवू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे लोकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.