Cycle To Work: तुम्हाला माहितीये का? 'या' 5 देशात सायकलने ऑफिसला गेल्यावर मिळतो मोबदला

असे काही देश आहेत, जे आपले कर्मचारी सायकलने ऑफिसला यावे यासाठी प्रोत्साहन म्हणून त्यांना सायकल भत्ता देतात.
Cycle To Work
Cycle To WorkDainik Gomantak
Published on
Updated on

Cycle To Work : सायकलवरून ऑफिसला गेल्यावर तुम्हाला त्याचा आर्थिक मोबदला मिळणार! किती भन्नाट कल्पना आहे ही. जरी तुम्हाला यावर विश्वास बसत नसला तरी जगात असे काही देश आहेत, जे आपले कर्मचारी सायकलने ऑफिसला यावे यासाठी प्रोत्साहन म्हणून त्यांना सायकल भत्ता देतात.

डिजिटल विमा कंपनी 'लुको'तर्फे करण्यात आलेल्या सर्व्हेमधून जगभरातील 90 शहरांचे विश्लेषण करण्यात आले. या यादीमध्ये युरोपमधील टॉप 5 अशा देशांचा समावेश आहे जिथे सायकलचा जास्तीत जास्त वापर करण्यात येत असून लोकांमध्ये याची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सरकारने कामावर सायकलने येणाऱ्यांना ठराविक मोबदला देऊ केला आहे.

(In these 5 countries employees get paid for going to office by bicycle)

Cycle To Work
Sienna Weir Death: सुप्रसिद्ध ऑस्ट्रेलियन मॉडेलचा अवघ्या 23 व्या वर्षी मृत्यू; घोडेस्वारी करताना भीषण अपघात

असे देश कोणते ते पाहूया..

बेल्जियन

बेल्जियनमध्ये कर्मचाऱ्यांना सायकलने ऑफिसला जाण्यासाठी भत्ता देण्यात येतो. प्रती सायकल किलोमीटर कर्मचाऱ्यांना €0.24 युरो रुपयांचा मोबदला देण्यात येतो. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे हा मोबदला 1 मे 2023 पासून वाढवण्यात आला असून तो प्रती किलोमीटर €0.24 युरो वरून €0.27 युरो करण्यात आला आहे. इथे ही गोष्ट सर्रास केली जात असून मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली आहे.

नेदरलँड्स

डच लोक दररोज सरासरी 2.6 किमी सायकल चालवतात. एका अभ्यासानुसार, इतर देशांमध्येही हे फॉलो केले गेले तर वार्षिक जागतिक कार्बन उत्सर्जन 686 दशलक्ष टनांनी कमी होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

इथले प्रशासन सायकल प्रवाशांना प्रती ‘मायलेज भत्ता’ देऊन या आरोग्यदायी सवयीला प्रोत्साहन देत आहे. 2006 पासून, अनेक कंपन्यांनी बाईक चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रती किलोमीटर €0.19 युरो देऊ केले होते, जो खर्च सरकार त्यांना त्यांच्या करामधून (Tax Bill) वजा करण्यास परवानगी देते. हा मायलेज भत्ता पूर्वी फक्त बाईक चालवणाऱ्यांसाठी होता, मात्र 2007 मध्ये हा सायकलस्वारांसाठी सुरू करण्यात आला.

आठवड्यातून पाच दिवस दररोज 10 किलोमीटर सायकल चालवणारा कर्मचारी या योजनेतून वर्षाला सुमारे €480 युरो कमवू शकतो.

Cycle To Work
Cycle To WorkDainik Gomantak

इटली

इटलीमध्येही सायकलवरून कामावर जाणाऱ्यांना प्रवास भत्ता देण्यात येतो. मात्र इथे कर्मचारी कुठे राहतो हे महत्वाचे आहे. कर्मचारी राहत असलेले ठिकाण किंवा प्रांत यावरून त्याला दिल्या जाणाऱ्या भत्त्याची रक्कम ठरते.

इटलीच्या पुगलिया प्रदेशाची राजधानी बारीमध्ये कर्मचाऱ्यांना प्रत्येक किलोमीटरसाठी €0.21 युरो देण्यात येतात. जे प्रत्येक महिन्याला साधारण €25 पर्यंत पोहोचतात.

ब्रिटन आणि लक्झेंबर्ग

काही देश सायकल चालवणाऱ्यांना प्रती किलोमीटर भत्ता देत नाहीत. त्याऐवजी उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देतात.

लक्झेंबर्गमध्ये, सायकलवरून कामावर जाणारे लोक नवीन सायकल खरेदी करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक आयकरातून €300 पर्यंत कपात करू शकतात.

ब्रिटनमध्ये अधिकृत सायकल-टू-वर्क योजनेसाठी कर्मचारी त्यांच्या कंपनीमार्फत सायकल खरेदी करू शकतात. कर्मचारी सायकलच्या वास्तविक किमतीच्या 32 टक्क्यांपर्यंत रकमेचा दावा कंपनीकडे करू शकतात

Cycle To Work
Cycle To WorkDainik Gomantak

सायकल-टू-वर्क ही कल्पना चांगली का आहे?

  • संपूर्ण युरोपमध्ये, सरकार सायकल-टू-वर्क योजना लागू करण्याचा विचार करत आहे.

  • स्पेनमध्ये, सरकार ‘En Bici al trabajo’ या नवीन कार्यक्रमावर विचार करत आहे जे कर्मचार्‍यांना कामावर सायकलने येण्यासाठी पैसे देईल.

  • तसेच सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक कामावर जाताना सायकल चालवतात त्यांना कर्करोग होण्याचा धोका 45 टक्क्यांनी कमी होतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका 46 टक्के कमी असतो.

  • कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठीदेखील हा एक परिणामी उपाय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com