Pakistan: प्लास्टिकच्या पिशवीत मिळतोय LPG

Pakistan: तज्ञांच्या मते, एलपीजीने भरलेल्या या प्लास्टिकच्या पिशव्या म्हणजे चालते फिरते बॉंबच आहेत.
 LPG
LPGDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan: पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. पाकिस्तानी नागरिकांच्या पायाभूत गरजा पूर्ण होणे अशक्य बनले आहे. या पार्श्वभूमीवर अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानमध्ये नागरिक कुकिंग गॅस प्लास्टिकच्या पिशवीतून आणत आहेत. प्लास्टिकच्या पिशवीतून कुकिंग गॅस आणणे हे किती धोकादायक आहे हे माहित असूनही नागरिक अशा प्रकारे गॅस जेवण बनवण्यासाठी वापरत आहेत. याचे कारण म्हणजे गॅसचे दर इतके वाढले आहेत ते सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर विकत घेणे अशक्य झाले आहे. हा धोकादायक प्रकार पाकिस्तान ( Pakistan) च्या खैबर पख्तूनख्वा प्रातांत घडत आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार पख्तून प्रातांतील कराक जिल्ह्यात 2007 पासून गॅस कनेक्शन दिले गेले नाही तर दुसरीकडे शेजारील हांगू जिल्ह्यात मागच्या 2 वर्षापासून गॅस पाइप तुटला आहे. जिथे ही पाईप तुटला आहे लोक तिथून लोक 2-2 तास रांगेत उभे राहून प्लास्टिकच्या पिशवीतून गॅस भरुन घेऊन जातात.

 LPG
Pakistan: आतंकवादाला हत्यार बनवणाऱ्या देशासोबत चर्चा...

गॅस पाईपलाईन नेटवर्क सोबत जोडणाऱ्या दुकानांमध्ये हा गॅस कंप्रेशरच्या मदतीने 2 किलोग्रॅम 3 किलोग्रॅम असा प्लास्टिकच्या पिशवीत भरला जातो. या पिशव्यांचे तोंड नॉजेल और वॉल्वने घट्ट केले जाते. LPG ने भरलेल्या या पिशव्या लोकांना विकल्या जातात. लोक इलेक्ट्रिक सक्शन पंपाच्या मदतीने स्वयंपाक करण्यासाठी याचा वापर करतात. 500-900 रुपयांत हा गॅस लोक विकत घेऊ शकतात.

पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार 3 ते 4 किलोग्रॅमची गॅसची पिशवी भरण्यासाठी 1 तासाचा वेळ लागतो. तज्ञांच्या मते, एलपीजीने भरलेल्या या प्लास्टिकच्या पिशव्या म्हणजे चालते फिरते बॉंबच आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com