पत्रकारितेसाठी चीन बनला जगातील सर्वात मोठा तुरुंग; 127 पत्रकार ड्रॅगनने केले कैद: रिपोर्ट

'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स' (RSF) या आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्थेने एका अहवालात चीनला (China) सर्वाधिक पत्रकार कैदेत ठेवणारा देश म्हणून वर्णन केले आहे.
Xi Jinping
Xi JinpingDainik Gomantak
Published on
Updated on

'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स' (RSF) या आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्थेने एका अहवालात चीनला (China) सर्वाधिक पत्रकार कैदेत ठेवणारा देश म्हणून वर्णन केले आहे. चीनने किमान 127 पत्रकारांना (Journalists) ताब्यात घेतल्याचे अहवालात म्हटले आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने "संवेदनशील" समजल्या जाणार्‍या समस्यांचे वृत्तांकन आणि प्रकाशन केल्याबद्दल पत्रकारांना ताब्यात घेतले आहे. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या म्हणण्यानुसार, या पत्रकारांमध्ये व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक मीडिया व्यक्तींचाही समावेश आहे.

आरएसएफच्या म्हणण्यानुसार, यापैकी निम्म्याहून अधिक मीडिया व्यक्तींमध्ये 71 उइघुर पत्रकारांचा (Uyghur Journalists) समावेश आहे. 2016 पासून, बीजिंग सरकार "दहशतवादाविरुद्ध लढा" या नावाने उइगरांविरुद्ध हिंसक मोहीम राबवत आहे. अहवालात आरएसएफचे सरचिटणीस क्रिस्टोफ डेलॉयर (Christophe Delaware) यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, चीन (China) प्रेस स्वातंत्र्य गमावत आहे. पॅरिसस्थित आरएसएफने सांगितले की, अहवालात माहितीच्या अधिकाराविरुद्ध दडपशाहीच्या मोहिमेची व्याप्ती दर्शविली आहे.

Xi Jinping
जम्मू काश्मीरसाठी पाकिस्तानचे थेट UN ला पत्र

पत्रकारांना 90 तासांचे प्रशिक्षण दिले जाईल

वॉचडॉगने एका अहवालात म्हटले आहे की, पत्रकारांना "संवेदनशील" विषयांची चौकशी करणे किंवा सेन्सॉर केलेली माहिती प्रकाशित करणे यासारख्या कामांसाठी ताब्यात घेतले जात आहे, जेथे गैरवर्तनामुळे मृत्यू होऊ शकतो. पत्रकारांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे मुखपत्र बनण्यास कसे भाग पाडले जात आहे हेही आरएसएफच्या अहवालात उघड झाले आहे. अहवालानुसार, त्यांचे प्रेस कार्ड प्राप्त करण्यासाठी आणि नूतनीकरण करण्यासाठी, पत्रकारांना लवकरच 90 तासांचे वार्षिक प्रशिक्षण दिले जाऊ शकते, जे अंशतः शी जिनपिंग यांच्या विचारांवर केंद्रित असेल.

चिनी पत्रकारांची परिस्थिती वाईट

2020 मध्ये चीनच्या मध्यवर्ती शहर वुहानमध्ये (Wuhan) कोविड-19 संकटाबाबत वार्तांकन केल्याबद्दल किमान दहा पत्रकार आणि ऑनलाइन समालोचकांना अटक करण्यात आली होती. आजपर्यंत, त्यापैकी दोन - झांग झान आणि फॅंग बिन - अजूनही कोठडीत आहेत. चिनी पत्रकारांची स्थिती तर आणखी वाईट आहे. अहवालात ऑक्टोबर 2019 मध्ये सादर करण्यात आलेल्या निर्णयाचा संदर्भ देखील देण्यात आला आहे की, सर्व चीनी पत्रकारांनी "स्टडी शी, स्ट्रेंथ द कंट्री" नावाचे स्मार्टफोन अॅप वापरावे, जे वैयक्तिक डेटाचे संकलन सक्षम करु शकते. RSF ने 2021 च्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये चीनला 180 पैकी 177 वे स्थान दिले आहे, जे उत्तर कोरियापेक्षा फक्त दुसऱ्या स्थानांवर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com