Boeings-747: 'आसमान की रानी'चा पाच दशकांहून अधिक काळाचा प्रवास अखेर संपला

Boeings-747: जंबो जेट बोइंग-747 ला आसमानची रानी असेसुद्धा संबोधले जाते. याच्या शेवटच्या मालवाहतुक विमानाची विक्री मंगळवारी अ‍ॅटलस एअर या कंपनीला करणार असल्याची माहिती बोइंग कंपनीने दिली आहे.
Boeings-747
Boeings-747Dainik Gomantak
Published on
Updated on

Boeings-747: अमेरिकेची बोइंग कंपनी आपल्या जंबो जेट बोइंग-747 शेवटची डिलीवरी करणार आहे. या जंबो जेट बोइंग-747 ला आसमानची रानी असेसुद्धा संबोधले जाते.

याच्या शेवटच्या मालवाहतुक विमानाची विक्री मंगळवारी अ‍ॅटलस एअर या कंपनीला करणार असल्याची माहिती बोइंग कंपनीने दिली आहे.

जवळजवळ 53 वर्षापूर्वी बोइंग-747 च्या निर्मितीला सुरुवात केली होती. कंपनीने आता या विमानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतीचे हे खास विमान असल्याचे म्हटले जाते.

त्याबरोबरच, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी आफ्रिकेतून भारतात 8चित्ते आणले होते तेव्हा याच विमानातून आणले होते. बोईंग 747 लांब, रुंद असून दूरचा प्रवास करण्यास सक्षम आहे.

Boeings-747
Financial Crisis: कंगाल पाकिस्ताननंतर 'या' मुस्लिम देशाचे चलन आर्थिक गर्तेत, अन्न मिळवण्यासाठी...

दरम्यान, 9 फेब्रुवारी 1969 ला या विमानाने आकाशात पहिल्यांदा झेप घेतली होती. या विमानाला कैप्टन, दूसरा फ्लाइट ऑफिसर आणि तिसरा फ्लाइट इंजीनियर असे तीघेजण चालवतात.

सामान्यत: यामध्ये 276 ते 495 आसनक्षमता असते मात्र गरजेनुसार यात बदल होऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, एकाचवेळी 600 प्रवासी प्रवास करु शकतात. म्हणून याला जंबो जेट म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com