बेलारुसला युरोपियन युनियनशी 'युद्ध' हवयं का?

बेलारुसचे (Belarus) अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को (Alexander Lukashenko) यांनी रशियाकडे (Russia) अण्वस्त्रांची मागणी केली आहे.
Belarusian President Alexander Lukashenko
Belarusian President Alexander LukashenkoDainik Gomantak

बेलारुसचे (Belarus) अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को (Alexander Lukashenko) यांनी रशियाकडे (Russia) अण्वस्त्रांची मागणी केली आहे. देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागात युद्धाची भीती वाढल्याने अण्वस्त्रे तैनात (Nuclear Weapons) करण्याची मागणी राष्ट्रपतींनी केली आहे. लुकाशेन्को यांच्याकडे युरोपचा (Europe) शेवटचा हुकूमशहा म्हणून पाहिले जाते. राष्ट्राध्यक्षांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा देशाच्या सीमेवर पोलंडसह (Poland) स्थलांतरितांचे संकट (Migrant Crisis) वाढत आहे. दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.

रशिया बेलारुसचा जवळचा मित्र आहे (Russia-Belarus Relations). बेलारुसवर युरोपियन युनियनने (European Union) हजारो स्थलांतरितांना पोलंडमध्ये बेकायदेशीरपणे पाठवल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर असे मानले जात आहे की, बेलारुसवर नवीन निर्बंध लादले जाऊ शकतात, ज्यामुळे तणाव आणखी वाढू शकतो. लुकाशेन्को यांनी रशियन संरक्षण नियतकालिक नॅशनल डिफेन्सला सांगितले की, आम्हाला अण्वस्त्र-सक्षम इस्कंदर मोबाईल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणालीची आवश्यकता आहे. या अस्त्राची रेंज 500 किमी पर्यंत असून ते पारंपारिक किंवा अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते.

Belarusian President Alexander Lukashenko
रशिया युद्धाच्या तयारीत!

रशियाने शस्त्रास्त्रांवर भाष्य केले नाही

युरोपियन युनियनचे सदस्य पोलंड आणि लिथुआनिया (Lithuania) बेलारुसच्या पश्चिमेस आहेत. त्याची दक्षिण सीमा युक्रेनला (Ukraine) लागून आहे. लुकाशेन्को यांनी क्षेपणास्त्र प्रणाली घेण्याबाबत मॉस्कोशी (Moscow) काही चर्चा केली आहे की, नाही याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बेलारुस आणि रशिया औपचारिकपणे "संघीय राज्य" चा भाग असून एकत्र येण्यासाठी अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहेत. दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंधांमुळे शेजारी राष्ट्र युक्रेनमध्येही खळबळ उडाली आहे.

संकटाचे लष्करी संघर्षात रुपांतर होण्याची भीती

दरम्यान, काल रात्री बेलारशियन सैन्याने (Belarusian troops) सीमेवरील कुंपण तोडले आणि पोलिश सैन्यांना ते पुन्हा बांधण्यापासून रोखले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांच्या आदेशानुसार बेलारशियन सैन्याने पोलिश सैन्याविरुद्ध वापरण्यासाठी स्थलांतरितांना अश्रुधुराचे गोळे दिले. या संकटामुळे आंतरराष्ट्रीय तणाव वाढत आहे. बेलारुसच्या शेजाऱ्यांनी इशारा दिला आहे की, परिस्थिती लष्करी संघर्षातपर्यंत वाढू शकते. बेलारुसने शनिवारी सांगितले की, सीमेवरील तात्पुरत्या शिबिरात येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या दररोज वाढत असून 100 पर्यंतचा एक गट पोलिश प्रदेशात पोहोचला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com