भांडी, साड्या चोरल्या! शेख हसीनांनी देश सोडताच आंदोलकांचा PM निवासस्थानावर कब्जा Video

Bangladesh: आरक्षणाच्या मुद्यावरुन गेल्या महिन्याभरापासून बांगलादेश धगधगत आहे. मात्र आज (5 ऑगस्ट) परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
भांडी, साड्या चोरल्या! शेख हसीनांनी देश सोडताच आंदोलकांचा PM निवासस्थानावर कब्जा Video
bangladesh protesters storm pm residence after sheikh hasina fleesDainik Gomantak
Published on
Updated on

आरक्षणाच्या मुद्यावरुन गेल्या महिन्याभरापासून बांगलादेश धगधगत आहे. मात्र आज (5 ऑगस्ट) परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला. यातच आता, समोर आलेल्या अपडेटनुसार आंदोलकांच्या जमावाने पंतप्रधान निवासस्थानावर कब्जा केला आहे. यावेळी, त्यांनी झेंडे फडकवत जल्लोष साजरा केला. काहींनी तर हसीना यांच्या सरकारी निवासस्थानाचे दरवाजे तोडले. आंदोलक हसीना यांच्या निवासस्थानातून साड्या, मौल्यवान भांडी आणि इतर वस्तू चोरताना दिसले. सोशल मीडियावर आंदोलकांचे व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहेत.

दरम्यान, हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेच देश सोडला. लष्कर प्रमुख वकार उझ झमान यांनी याची पुष्टी केली. वृत्तानुसार, भारत सरकारने हसीना यांच्या भारतातील प्रवेशाच्या विनंतीला सहमती दर्शवल्यानंतर त्यांचे हेलिकॉप्टर त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे उतरले. हसीना आता दिल्लीहून लंडनला जाण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, बांगलादेश लष्कराने कमांड हाती घेतली असून त्यांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु केली आहे. लष्करप्रमुख वकार-उझ-जमान म्हणाले की, ''सत्ता हस्तांतरण सुरु आहे. अंतरिम सरकार लवकरच स्थापन होईल. आतापर्यंत झालेल्या आंदोलकांच्या हत्येची चौकशी केली जाईल. जनतेने लष्करावर विश्वास ठेवावा.'' यासोबतच त्यांनी जनतेला शांततेचे आवाहनही केले. त्यांनी जनतेला आवाहन केले की, 'तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आपण एकत्र येऊन काम करु. लढून काही मिळणार नाही. संघर्ष टाळा. आपण मिळून एक सुंदर देश घडवू.'

भांडी, साड्या चोरल्या! शेख हसीनांनी देश सोडताच आंदोलकांचा PM निवासस्थानावर कब्जा Video
Bangladesh Fire Viral Video: हॉटेलला लागलेल्या आगीत ४३ जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारी दृष्ये

सरकारी नोकऱ्यांमधील वादग्रस्त कोटा प्रणाली रद्द करण्याची मागणी विद्यार्थी गटांनी केल्याने बांगलादेश गेल्या महिन्यापासून निदर्शने आणि हिंसाचाराच्या गर्तेत आहे. विरोधकांनी बहिष्कार टाकलेल्या निवडणुकीनंतर जानेवारीमध्ये सलग चौथ्यांदा निवडून आलेल्या हसीना यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीने जोर धरला. देशभरात, आंदोलक आणि सरकार समर्थक लोक आमने-सामने आले. दुसरीकडे, सुरक्षा दलांनी आंदोलकांना दडपण्यासाठी गोळीबार केला. पोलिस, सरकारी अधिकारी आणि रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीवर आधारित एएफपीच्या टॅलीनुसार, जुलैच्या सुरुवातीला निदर्शने सुरु झाल्यापासून मृतांची संख्या 300 च्या वर पोहोचली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com