Awareness Of Food Waste: एकीकडे उपासमार तर दुसरीकडे कुणाला अन्नाची किंमतच नाही.. संयुक्त राष्ट्र संघटनांनी दाखवलं विदारक वास्तव

Awareness Of Food Waste: २०२२ मध्ये संपूर्ण जगभरात ७८३० लाख लोक उपासमारीचा सामना करत होते तर २०१९ मध्ये ही संख्या ६१८० लाख इतकी होती.
Hunger And Food Waste
Hunger And Food WasteDainik Gomantak
Published on
Updated on

Awareness Of Food Waste: आपल्या मुलभूत गरजांपैकी सर्वात महत्वाची गरज म्हणजे अन्न ही आहे. पुरेसे अन्न मिळाले की आपण आपल्या इतर गरजा पुरवण्याकडे लक्ष देऊ शकतो. अन्नटंचाई निर्माण होण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत ठरतात. त्यापैकी एक म्हणजे आर्थिक चणचण ही आहे. काहीवेळा अन्नधान्य उपलब्ध नसते.

आता संयुक्त राष्ट्राच्या एफएओ( Food Agriculture Organisation) आणि युएनइपी ( United Nation Environment Programme ) यांनी एकत्रितपणे केलेल्या सादर केलेल्या रिपोर्टमधून अन्नधान्याच्या नासाडीबद्दल सविस्तर माहीती आकडेवारीसहित दिली आहे.

काय सांगतात आकडे?

या रिपोर्टमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये संपूर्ण जगभरात ७८३० लाख लोक उपासमारीचा सामना करत होते तर २०१९ मध्ये ही संख्या ६१८० लाख इतकी होती. महत्वाची बाब म्हणजे एकीकडे इतके लोक उपासमारीचा सामना करत असताना दुसरीकडे दरवर्षी एक अरब टन अन्न वाया जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत असल्याचा इशारा एफएओ आणि य़ुएनइपीने संपूर्ण जगाला दिला आहे.

कशी होते अन्नाची नासाडी?

एफएओ आणि य़ुएनइपीने दिलेल्या आकडेवारीनुसार, १३ टक्के अन्नधान्य बाजारापर्यंत विविध साखळ्यामार्फत पोहचेपर्यंत खराब होते. याबरोबर एकूण अन्नपदार्थांपैकी १७ टक्के अन्नपदार्थ घर, हॉटेल आणि अन्य ठिकाणांहून कचऱ्यात जाते. अशाप्रकारे ३० टक्के अन्न वाया जाते.

Hunger And Food Waste
अमेरिकन काँग्रेसकडून श्री श्री रविशंकर अन् आचार्य लोकेश मुनींचा सन्मान

घरातून किती अन्न वाया घालवले जाते?

य़ुएनइपीने २०२१ मध्ये फूड वेस्ट इंडेक्स ( FWI ) मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार २०२१ मध्ये ९१६० लाख अन्नाची नासाडी झाली होती त्यापैकी ६१ टक्के अन्न हे घरातून वाया गेले होते तर २६ टक्के अन्न हे सरकारी अन्न सेवा कार्यलयातून आणि १३ टक्के अन्न हे हॉटेलमधून वाया गेले होते.

फक्त उपासमारच नाही तर पर्यावरणावरही होतो परिणाम

अन्नधान्याची आणि अन्नपदार्थांच्या नासाडीचा फक्त लोक उपाशी राहतात हा तोटा नसून त्याचा पर्यावरणावरही परिणाम होते. जागतिक स्तरावर दरवर्षी १.६ बिलियन टन अन्नाची नासाडी होते. यातून वातावरणात ३.३ बिलियन टन कार्बन डायऑक्साइड( CO2 ) उत्सर्जित केला जातो. याबरोबच सुपीक जमीनीच्या २८ टक्के जमीनीवर अन्नाची नासाडी होते.

नुकसान

अनेकदा हा दावा केला जातो की जे अन्न कचऱ्यात टाकले जाते त्यापासून खत बनवता येतो त्यामुळे कचऱ्यात टाकलेल्या अन्नाचा पुढेदेखील फायदा होतो.

अन्नापासून खत बनवण्याचा प्रयोग किंवा दावा खरा असला तरीही फक्त १ टक्के अन्नापासून खत बनवता येते. बाकीचे अन्न कचऱ्यातच खराब होते. त्यामुळे मिथेनसारखे घातक वायू बनण्यास सुरुवात होते. अन्ननासाडीचा हा दुहेरी तोटा आहे.

ग्लोबल हंगर इंडेक्स ( Global Hunger Index ) मध्ये भारताचे स्थान

या इंडेक्समध्ये २०२२ मध्ये भारत १२१ देशांमध्ये १०७ व्या स्थानी होता. तर २०२१ मध्ये १०१ व्या स्थानावर होता.

जागतिक स्तरावर पर्यावरणाचे संरक्षण होण्यासाठी, शाश्वत विकासासाठी CO2, मिथेन सारख्या वायूंचे उत्सर्जन करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. एकीकडे हे वायू उत्पन्न होऊ नये खबरदारी घेतली जात आहे तर दुसरीकडे अन्नधान्याच्या नासाडीतून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता अन्न नासाडी जागरुकता ( Food Waste Awareness) दिवसानिमित्त संयुक्त राष्ट्राच्या या संघटनांनी संपूर्ण जगाला अन्नधान्याच्या जागरुकता दिनानिमित्त इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com