Gwadar Port Attack: बलुचिस्तानच्या ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला, सुरक्षा दलांनी आठ बंदुकधारी मारले; ऑपरेशन सुरुच

Gwadar Port Attack: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष तीव्र झाल्यानंतर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी आता पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर हल्ला केला.
Gwadar Port Attack
Gwadar Port AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Gwadar Port Attack: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष तीव्र झाल्यानंतर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी आता पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत आठ बंदूकधारी ठार झाल्याची माहिती आहे. ग्वादर हे पाकिस्तानसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे बंदर आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदर प्राधिकरण संकुलात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केल्याची माहिती जिओ न्यूजने बुधवारी दिली. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हे हल्लेखोर ठार झाले.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. वृत्तानुसार, हल्लेखोरांनी पहिल्यांदा ग्वादर बंदरावर बॉम्बस्फोट घडवून आणला आणि त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत त्यांची चकमक सुरु झाली. ग्वादर बंदर हे चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) चा महत्त्वाकांक्षी भाग आहे. या प्रदेशात अनेक दशकांपासून फुटीरतावादी संघटना असूनही, ग्वादरच्या विकासासह बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत चीनने बलुचिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. हे बलुचिस्तानमधील खनिज समृद्ध क्षेत्र मानले जाते.

Gwadar Port Attack
Pakistan Surgical Strike: पाकिस्तानी हल्ल्याने चवताळला तालिबान; म्हणाला- ''आम्हाला सुपर पॉवरशी लढण्याचा अनुभव...''

बलुचिस्तान नैसर्गिक वायू आणि खनिजांनी समृद्ध

बलुचिस्तान प्रांत नैसर्गिक वायूपासून कोळसा आणि खनिजांपर्यंत नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. परंतु लोकसंख्येची कमी घनता, पाण्याची टंचाई आणि मानवी संसाधनांसह मूलभूत सुविधांची या प्रदेशात वणवा आहे. विशेष म्हणजे, ग्वादार पाकिस्तानचे सर्वात वंचित क्षेत्र राहिले आहे. येथील स्थानिक लोक ग्वादरच्या विकासाकडे त्यांच्या संसाधनांचे शोषण म्हणून पाहतात. त्यामुळे त्यांचा चीनला विरोध आहे.

पाकिस्तानने आपली खनिज संपत्ती चीनला सुपूर्द केल्याचे बलुचिस्तानी नेहमीच सांगतात. अशा परिस्थितीत, त्यांना समान लाभांशिवाय उपेक्षित आणि विस्थापित होण्याची भीती वाटते. या भावनेनेच ईस्ट तुर्किस्तान इस्लामिक मूव्हमेंट (ईटीआयएम), तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), लष्कर-ए-तैयबा, लष्कर-ए-तैयबा, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि कट्टरतावादी धार्मिक दहशतवादी संघटना या प्रदेशात फोफावल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com