अफगाणिस्तानपाठोपाठ आता अमेरिका 'हा' देश सोडणार! सैन्य मागे घेण्याबाबत इस्लामिक प्रतिकारांचे हल्ले...

US Troops in Iraq: हमास-इस्रायल यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, या युद्धामुळे अमेरिका सर्व बाजूंनी कात्रीत अडकला आहे.
US Troops in Iraq
US Troops in IraqDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

US Troops in Iraq:

इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, या युद्धामुळे अमेरिका सर्व बाजूंनी कात्रीत अडकला आहे. अमेरिकेच्या इस्रायल समर्थक धोरणाला संपूर्ण जगात तसेच आपल्या देशातही विरोध होऊ लागला आहे. युएन आणि मानवाधिकार संघटनांनी बायडन प्रशासनावर युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणताच, देशात उपस्थित असलेल्या झिओनिस्ट गटांनी बायडन यांच्यावर संताप व्यक्त केला.

यावर्षी अमेरिकेत निवडणुका होणार आहेत, जो बायडन यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच बायडन यांचे कमजोर नेतृत्व असलेले नेते असे वर्णन केले आहे. आता अमेरिका दुसऱ्या अफगाणिस्तान पाठोपाठ आणखी एका देशापुढे झुकताना दिसत आहे. अमेरिका इराकमध्ये दीर्घकाळापासून असलेले आपले सैन्य मागे घेण्याच्या विचारात असल्याची बातमी आहे.

वृत्तानुसार, वॉशिंग्टन आणि बगदादमध्ये सैन्य मागे घेण्याबाबत कराराची प्रक्रिया सुरु झाली आहे. अमेरिकेच्या या माघारीमागे इराकमधील इस्लामिक प्रतिकारांचे हल्ले असल्याचे सांगितले जात आहे. खरे तर, गाझा युद्ध सुरु झाल्यानंतर, लेबनॉन, सीरिया (Syria), येमेन आणि इराकमध्ये उपस्थित असलेल्या इस्लामिक प्रतिकार गटांनी घोषणा केली होती की, गाझा युद्ध थांबेपर्यंत ते इस्रायल आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले करतील.

US Troops in Iraq
Israel-Hamas War: गाझामधील इस्रायलच्या कारवाईवर भडकला हमास; ''युद्धविरामाच्या चर्चेला ब्रेक लावण्याचा हा प्रयत्न...''

"आमच्या हल्ल्यांनी अमेरिकेला भाग पाडले?"

इराकचे अल-नुजाबा रेझिस्टन्सचे प्रवक्ते हुसेन अल-मुसावी यांनी गुरुवारी एका लेबनीज वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "आम्ही आमच्या हल्ल्यांसह अमेरिकेला पुन्हा चर्चेच्या टेबलवर येण्यास भाग पाडले आहे."

हुसेन पुढे म्हणाले की, ''आमच्याकडून अमेरिकन ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेला वर्षांनंतर देश सोडण्यासाठी वाटाघाटी करण्यास भाग पाडले गेले. अमेरिकेशी (America) सरकारच्या चर्चेचे अद्याप स्पष्ट परिणाम समोर आलेले नाहीत, परंतु आमच्यासाठी इराकी लोकांचे हित प्रथम आहे, आम्ही त्यासाठी काम करत आहोत.'' याशिवाय, गाझा हल्ल्याच्या विरोधातही त्यांनी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

US Troops in Iraq
Israel-Hamas War: इस्रायली सैन्याचा अल शिफा हॉस्पिटलवर हल्ला, 20 ठार; हजारो लोकांनी घेतलाय आश्रय

अमेरिकन सैन्य इराकमध्ये 21 वर्षांपासून

दुसरीकडे, 2003 मध्ये, अमेरिकन सैन्याने इराककडे अण्वस्त्रे असल्याचा आरोप करत हल्ला केला. ज्यानंतर सद्दाम हुसेनला 2006 मध्ये अटक करुन फाशी देण्यात आली. वॉटसन इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, इराक हल्ल्यानंतर इराकमध्ये 3 लाखांहून अधिक लोक मारले गेले आहेत आणि तेव्हापासून आजपर्यंत इराकमध्ये शांतता नाही.

इराकमध्ये अजूनही अमेरिकन सैनिक मोठ्या संख्येने आहेत. अलीकडेच इराकी सरकारने सांगितले होते की, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युती सैन्याच्या माघारीसाठी एक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी वॉशिंग्टनशी चर्चा सुरु आहे. यावर्षी इराकमधून अमेरिकन सैन्य माघारी परतले तर अमेरिकेच्या निवडणुकांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

FDA Raids: तूप-जिऱ्याच्या पावडरला 'एफडीए'चा दणका; 5 निकृष्ट उत्पादनांवर तात्काळ विक्रीबंदी, बाजारातील साठा मागे घेण्याचे आदेश
US Iran talks three hour meeting
donald trump mojtaba khamenei
US Iran War Pentagon Audit Report 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com