तो माणूस आहे की प्राणी? पठ्ठ्यानं सलग 100 दिवस खाल्लं कच्चं मांस; म्हणाला, ‘लोक मला म्हणतील...’

America: अमेरिकेतील फ्लोरिडा येथील जॉन नावाचा हा व्यक्ती 100 दिवस सतत 'कच्चे चिकन खाण्याच्या' प्रयोगाने प्रसिद्ध झाला आहे.
John
JohnDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील जॉन नावाचा व्यक्ती सलग 100 दिवस कच्चे मांस खावून प्रसिद्ध झाला आहे. जॉनचा दावा आहे की, तो आता टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी बैलाचे कच्चे टेस्टिकल्स खात आहे. त्याला विचारले असता तो म्हणाला की, 'आता लोक मला वेडा म्हणतील.'

दरम्यान, असे प्रयोग वैज्ञानिक दृष्टिकोनातून कितपत योग्य की अयोग्य यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात. सर्वप्रथम, कच्चे मांस खाल्ल्याने संभाव्य आरोग्य धोके लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण, डॉक्टरांचे (Doctor) म्हणणे आहे की, कच्चे मांस खाल्ल्याने तुम्हाला फूड पॉयझनिंगसह इतर अनेक संसर्ग होण्याचा धोका असतो.

John
America Crime: अमेरिकेतील मिनियापोलिसमध्ये गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 जण ठार

दुसरीकडे, केवळ सोशल मीडियावर (Social Media) लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी असे धोकादायक प्रयोग करणे शहाणपणाचे नाही. जॉनला इंस्टाग्रामवर जवळपास 5 लाख लोक फॉलो करतात. नुकताच त्याने प्रयोगाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही लोक याला वेडेपणा मानतात, तर काही लोक कुतूहलाने ते पाहत आहेत.

जॉनचे असे प्रयोग धोकादायक असू शकतात आणि कोणत्याही वैज्ञानिक सल्ल्याशिवाय करु नयेत. सुरक्षितता आणि आरोग्याला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com