Afghanistan: लोकं नमाज अदा करत होते अन्… मशिदीत पुन्हा स्फोट, 14 ठार

तालिबानच्या ताब्यात आल्यापासून अफगाणिस्तान सतत बॉम्बस्फोटांच्या तडाख्यात आहे. देशात पुन्हा एकदा स्फोटाची घटना समोर आली आहे.
Blast
BlastDainik Gomantak
Published on
Updated on

Afghanistan bomb blast: तालिबानच्या ताब्यात आल्यापासून अफगाणिस्तान सतत बॉम्बस्फोटांच्या तडाख्यात आहे. देशात पुन्हा एकदा स्फोटाची घटना समोर आली आहे. येथील हेरात प्रांतातील गुजरगाह मशिदीत मोठा बॉम्बस्फोट झाला असून त्यात मशिदीचा इमाम मारला गेला आहे. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, या स्फोटात मशिदीचे इमाम आणि मौलवी मुजीब रहमान अन्सारी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या हेरातमध्ये शुक्रवारी ही घटना घडली, जेव्हा लोक नमाजासाठी मशिदीत जमले होते. हा आत्मघाती हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गुजरगाह मशिदीच्या आत असलेल्या मौलवी मुजीब रहमान अन्सारी यांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत.

Blast
Taliban Rule: 24 तास टॉर्चर, WION रिपोर्टर अनस मलिकच्या टीमवर तालिबान्यांकडून हल्ला
Blast
Taliban Women Protest: स्वातंत्र्या'साठी निदर्शने करणाऱ्या महिलांवर तालिबानी सैनिकांचा गोळीबार

लोक शुक्रवारची नमाज अदा करत होते आणि…

मिळालेल्या माहितीनुसार, हेरातमधील गुजरगाह मशिदीत स्फोट झाला, ज्यात तालिबान समर्थक धार्मिक व्यक्तिमत्व मौलवी मुजीब रहमान अन्सारी मारले गेले. त्यांच्या प्रवचनांना अनेक लोक नियमित हजेरी लावतात. या दरम्यान, मशिदीत आज नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला, टोलो न्यूजने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, या बॉम्बस्फोटात मौलवीला आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी हेरातच्या गव्हर्नरच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा स्फोट आत्मघातकी हल्ल्यामुळे झाला आणि लोक मशिदीमध्ये शुक्रवारची नमाज अदा करत असताना हा संपुर्ण प्रकार घडला. मात्र, या स्फोटात किती लोकांचा मृत्यू झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com