‘जगभरातील पाच वर्षांखालील 40 कोटी बालकं स्वतःच्या घरात सुरक्षित नाहीत’; युनिसेफचा दावा

400 Million Young Kids Violently Disciplined At Home: जगभरातील पाच वर्षांखालील सुमारे 40 कोटी मुलं स्वतःच्या घरात सुरक्षित नाहीत.
400 Million Young Kids Violently Disciplined At Home
400 Million Young Kids Violently Disciplined At HomeDainik Gomantak
Published on
Updated on

400 Million Young Kids Violently Disciplined At Home: जगभरातील पाच वर्षांखालील सुमारे 40 कोटी मुलं स्वतःच्या घरात सुरक्षित नाहीत. अनेक पालक आपल्या मुलांना शिस्त शिकवण्यासाठी हिंसेचा वापर करतात. परिणामी, त्याचा थेट परिणाम मुलांच्या विकासावर होतो. या वयातील 60 टक्के मुले अशी आहेत, ज्यांना घरात शारीरिक किंवा मानसिक छळ सहन करावा लागतो. असे युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंडचे (युनिसेफ) म्हणणे आहे.

दरम्यान, युनिसेफने 2010 ते 2023 पर्यंत 100 देशांचा डेटा गोळा केल्यानंतरच हा अंदाज वर्तवला आहे. डेटामध्ये शारीरिक आणि मानसिक शोषण या दोन्ही समाविष्ट आहेत. युनिसेफच्या मते, मानसिक शोषणामध्ये लहान मुलावर ओरडणे किंवा शारीरिक शोषणादरम्यान त्यांना “मूर्ख” किंवा “आळशी” म्हणणे समाविष्ट असू शकते.

400 Million Young Kids Violently Disciplined At Home
Hepatitis B and C: 3.5 कोटी भारतीयांना धोका! WHO चा धक्कादायक रिपोर्ट; अशी ओळखा लक्षणे

यूएन एजन्सीने म्हटले की, अंदाजे 400 दशलक्ष मुलांपैकी सुमारे 300 दशलक्ष शारीरिक शिक्षा भोगत आहेत. जरी अधिकाधिक देश मुलांच्या शारीरिक शिक्षेवर बंदी घालत असले तरी, पाच वर्षांखालील सुमारे 50 कोटी मुलांना अशा शिक्षेपासून कायदेशीर संरक्षण नाही.

युनिसेफच्या म्हणण्यानुसार, चारपैकी एकापेक्षा जास्त माता किंवा जबाबदार प्रौढ लोक मानतात की त्यांच्या मुलांना योग्य प्रकारे शिक्षण मिळण्यासाठी शारीरिक शिक्षा आवश्यक आहे. जेव्हा मुले घरात शारीरिक किंवा मानसिक छळ सहन करतात किंवा जेव्हा त्यांना प्रिय व्यक्तींकडून सामाजिक आणि भावनिक देखभालीपासून वंचित ठेवले जाते तेव्हा त्यांच्यामधील आत्म-मूल्य आणि विकासाची भावना कमी होऊ शकते.

400 Million Young Kids Violently Disciplined At Home
Bacterial Infection कोरोना नंतर जगभरातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण; WHO चा अलर्ट, ''प्रतिबंध हाच उपाय...''

पहिला आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन 11 जून रोजी साजरा केला गेला. युनिसेफनेही पहिल्यांदा मुलांना खेळण्यासाठी सक्षम कसे करता येईल, यावर आपले मत मांडले. 85 देशांच्या आकडेवारीनुसार, चार वर्ष वयोगटातील दोन मुलांपैकी एक मूल घरी त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीसोबत खेळू शकत नाही. तर पाच वर्षांखालील मुलांकडे खेळणी नाहीत. दोन ते चार वयोगटातील सुमारे 40 टक्के मुले घरात अर्थपूर्ण संवाद साधत नाहीत आणि 10 पैकी एकाला वाचन किंवा कहाणी सांगण्यास कोणीही नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com