Farmer Protest: आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे शेतकरी आज (16 फेब्रुवारी) देशव्यापी बंदचे पालन करत आहेत. आंदोलनादरम्यान, रस्ता अडवण्यावरुन दोन महिला आणि शेतकऱ्यांच्या गटामध्ये झालेल्या जोरदार वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांची चारचाकी गाडी थांबवल्याने कारमधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांचा राग अनावर झाला. कार चालवत असलेल्या महिलेने शेतकऱ्यांना मधले बोट दाखवले आणि त्यांच्यावर अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला.
दरम्यान, व्हिडिओची सुरुवात कारमधील एका महिलेने कथितरित्या रस्ता अडवणाऱ्या शेतकऱ्यांना मधले बोट दाखवून होते. ती त्यांना शिवीगाळ करताना आणि तिची गाडी का थांबवली असा जाब विचारताना दिसत आहे. वाद सुरु असताना एका व्यक्तीने तिचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही महिला अधिक चिडते आणि आरोप करते की, "तू माझ्यावर हात का उचललास? तू मला अयोग्यरित्या स्पर्श का केलास?"
दरम्यान, आंदोलनकर्त्यांपैकी एक शेतकरी तणाव कमी करण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे, पण त्याचे प्रयत्न व्यर्थ जातात. दुसरीकडे मात्र, ही घटना कधी घडली हे लगेच कळू शकले नाही.
दुसरीकडे, सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत शेतकरी भारत बंद पाळत आहेत. बंद पुकारण्याचा परिणाम प्रामुख्याने पंजाबमध्ये दिसून आला आहे, जिथे सरकारी मालकीच्या पंजाब रोडवेज, PUNBUS आणि खाजगी सार्वजनिक वाहतूक बस ऑपरेटर्सचे कर्मचारी देखील संपावर गेले आणि आंदोलक शेतकऱ्यांना आम्ही तुमच्या बरोबर आहोत असा संदेश दिला. दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद राहिल्याने शेजारच्या हरियाणामध्येही याचा परिणाम दिसून आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.