एसडीएमच्या नोकरीपासून ते अर्थमंत्री पदापर्यंत, जाणून घ्या यशवंत सिन्हा यांचा राजकीय प्रवास

यशवंत सिन्हा पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला टक्कर देणार आहेत.
Yashwant Sinha
Yashwant SinhaDainik Gomantak

President Candidate 2022 : आज दिल्लीत पार पडलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा असतील, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. म्हणजेच आता यशवंत सिन्हा पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला टक्कर देणार आहेत. तत्पूर्वी, माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.(Yashwant sinha declared opposition candidate for president post)

दरम्यान, एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत सामील होण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. यशवंत सिन्हा यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1937 रोजी पाटणामध्ये झाला. यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचे शिक्षण पाटणामध्येच झाले. त्यानंतर ते 1960 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले आणि 24 वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय सेवेत घालवले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. 4 वर्षे त्यांनी उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम केले.

Yashwant Sinha
राष्ट्रपती निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांचा मोठा इशारा

राजकीय कारकीर्द

यशवंत सिन्हा यांनी 1984 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि जनता पक्षाचे सदस्य म्हणून सक्रिय राजकारणात सामील झाले. 1986 मध्ये त्यांना जनता पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस बनवण्यात आले. 1988 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1989 मध्ये जनता दलाच्या स्थापनेनंतर त्यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. नोव्हेंबर 1990 ते जून 1991 या काळात त्यांनी चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून कामही केले.

भाजप

जून 1996 मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते बनले. मार्च 1998 मध्ये त्यांची अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, ते 1 जुलै 2002 ते 22 मे 2004 रोजी संसदीय निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन होईपर्यंत परराष्ट्र मंत्री होते. त्यांनी लोकसभेत झारखंडच्या (Jharkhand) हजारीबाग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. परंतु 2004 च्या निवडणुकीत यशवंत सिन्हा हजारीबागमधून निवडणूक हरले. 13 जून 2009 रोजी त्यांनी भाजपच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 2018 मध्ये त्यांनी भाजपला रामराम केला.

Yashwant Sinha
यशवंत सिन्हा भरणार राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून उमेदवारी अर्ज

तृणमूल काँग्रेस

2021 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश केला. आणि तेव्हापासून ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिले. आज त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर त्यांनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com