
Viral Video Woman Gulab Jamun: आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करायला तयार आहेत. कधी-कधी तर असे व्हिडिओ (Video) समोर येतात की ते पाहून लोक विचारात पडतात, ‘हे काय चाललंय?’ असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे, ज्यात एक महिला एकाच वेळी तीन मोठे गुलाबजाम (Gulab Jamun) खाण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला (Women) खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिच्यासमोर एका ताटात मोठे गुलाबजाम आहेत. ती एकाच वेळी तीन गुलाबजाम उचलते आणि ते खाण्याचा प्रयत्न करते. एकाचवेळी तीन गुलाबजाम खाणे शक्य नसल्याने, ती ते जबरदस्तीने तोंडात घालण्याचा प्रयत्न करते. तिचा हा प्रयत्न पाहून जणू काही ती एखाद्या पोत्यात सामान भरत असल्यासारखे वाटते.
@imnatasha09 नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया (Social Midea) प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. “इंटरनेट चुकीच्या लोकांच्या हातात गेले आहे,” असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला गेला असून, नेटकऱ्यांनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, “गुलाबजामही विचार करत असेल की मी कुठे अडकलो!” दुसऱ्याने लिहिले की, “हे महादानवा, आम्हाला सोडून दे.” तसेच, अनेकांनी, “लोक काय-काय करतात,” अशा प्रतिक्रिया दिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.