54th Vijay Diwas: 16 डिसेंबर... पाकिस्तानच्या 93000 सैनिकांनी भारतीय लष्करापुढे केले होते आत्मसमर्पण; वाचा संपूर्ण कहाणी

54th Vijay Diwas: 16 डिसेंबर 1971… ही फक्त एक तारीख नाही. भारतीय लष्कराच्या शौर्याची आठवण करुन देणारी ही तारीख आहे.
54th Vijay Diwas
54th Vijay DiwasDainik Gomantak
Published on
Updated on

54th Vijay Diwas: 16 डिसेंबर 1971… ही फक्त एक तारीख नाही. भारतीय लष्कराच्या शौर्याची आठवण करुन देणारी ही तारीख आहे. या तारखेला भारताने युद्धात पाकिस्तानचा पराभव करुन बांगलादेश या नव्या देशाचा पाया घातला, जो पूर्वी पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता. म्हणूनच 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी पाकिस्तानी लष्कराच्या 93,000 सैनिकांनी भारतीय लष्करासमोर आत्मसमर्पण केले होते. विशेष म्हणजे, 13 दिवस चाललेल्या या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानची संपूर्ण टँक रेजिमेंट उद्ध्वस्त केली होती.

या युद्धाने बांगलादेशला जन्म दिला

दरम्यान, हे युद्ध 3 डिसेंबर रोजी सुरु झाले होते आणि 16 डिसेंबर रोजी ढाका येथे पाक लष्कराने भारतासमोर शरणागती पत्करली. पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आणि बांगलादेश या नव्या राष्ट्राचा जन्म झाला. पाकिस्तानला भारताकडून प्रत्येक आघाडीवर पराभवाला सामोरे जावे लागले.

54th Vijay Diwas
Indian Army: हेरगिरी प्रकरणी लष्कराच्या मेजरची हाकालपट्टी, थेट राष्ट्रपतींनी केली कारवाई

या विजयामुळे भारताची स्थिती मजबूत झाली

या युद्धात सॅम माणेकशॉ यांनी भारतीय लष्कराचे नेतृत्व केले होते. या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1971 च्या या विजयाने या प्रदेशात भारताचे स्थान मजबूत झाले आणि भारतीय लष्कराच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला ज्याचा भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे आणि जो कधीही विसरता येणार नाही. युद्धाच्या काही महिन्यांपूर्वी, माणेकशॉ यांनी प्रत्येक सैनिकामध्ये विजय मिळवण्याची भावना जागृत केली होती. युद्धापूर्वी मानसिक तयारीचा त्यांचा मंत्र हा त्यांच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग होता. भारताच्या नेत्रदीपक विजयानंतरही माणेकशॉ यांनी नैतिक आचरणाला प्राधान्य दिले.

रामेश्वर नाथ काओ

रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) चे प्रमुख असलेले रामेश्वर नाथ काओ या युद्धात पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावत होते. बांगलादेशच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पडली. 1971 च्या युद्धातील त्यांची एक विशेष कामगिरी म्हणजे RAW ने मुक्ती वाहिनीला पाठिंबा देणे. त्यांच्या नेतृत्वाखाली RAW ने एक लाखाहून अधिक मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना प्रशिक्षण दिले. त्यांच्या राजनैतिक हालचालीने पूर्व पाकिस्तानचे विलीनीकरण आणि बांगलादेशच्या जन्मासह पूर्वेकडील सीमेवरील सुरक्षेच्या चिंतांपासून भारताला मुक्त केले. विशेषत: त्यावेळी चीनच्या रुपाने मोठा धोका होता.

54th Vijay Diwas
Indian Army: स्पेशल फोर्सेसना प्रशिक्षण देण्यासाठी पहिल्या वर्टिकल विंड टनल UDAANची स्थापना, पहा व्हिडीओ

ब्रिगेडियर कुलदीप सिंग चांदपुरी

कुलदीप सिंग चांदपुरी हे 1971 च्या युद्धात लष्करात मेजर होते. जेव्हा पाकिस्तानी सैन्याने लोंगेवाला सीमेवर हल्ला केला तेव्हा त्यांच्याकडे फक्त 120 सैनिकांची तुकडी होती आणि त्यांच्यासमोर पाकिस्तानी लष्कराचे 2000 हून अधिक सैनिक आणि 40 रणगाड्यांचा ताफा होता. मात्र चांदपुरींच्या नेतृत्वापुढे आणि भारतीय जवानांच्या शौर्यापुढे पाकिस्तानी सैनिक टिकू शकले नाहीत. चांदपुरींच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी कोणत्याही युद्धात दाखवलेले धैर्य क्वचितच कुठेही पाहायला मिळते. चांदपुरी यांनी आपल्या सैनिकांमध्ये अशी हिंमत निर्माण केली की पराभव स्वीकारणे तर दूरच, त्यांनी पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला. या घटनेवर बॉर्डर हा प्रसिद्ध चित्रपटही तयार झाला होता.

फ्लाइंग ऑफिसर निर्मल जीतसिंग सेखों

फ्लाइंग ऑफिसर निर्मल जीतसिंग सेखों, परमवीर चक्र प्राप्त करणारे पहिले आणि एकमेव हवाई दल अधिकारी, यांनी श्रीनगर एअरफील्डचे रक्षण करताना अदम्य साहस दाखवले. 1971 च्या युद्धात ते 18 स्क्वॉड्रनचा भाग होते आणि श्रीनगर एअरबेसवर तैनात होते. 14 डिसेंबर 1971 रोजी ते फ्लाइट लेफ्टनंट बलधीर सिंग घुमान यांच्यासोबत स्टँडबाय ड्युटीवर होते. त्यानंतर पाकिस्तानी हवाई दल F-86 सेबरजेटने श्रीनगर एअरबेसवर बॉम्बस्फोट घडवणार होते. एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये दळणवळणाची समस्या असूनही सेखों आणि घुमान यांनी उड्डाण केले. टेकऑफच्या वेळी सेखों यांनी पाकिस्तानी विमाने आपल्याजवळून जाताना पाहिली आणि त्यांचा सामना केला. त्यांनी शत्रूची दोन विमाने पाडली. यानंतर त्यांना चार पाकिस्तानी विमानांनी घेरले. या चकमकीत त्यांच्या विमानाचेही मोठे नुकसान झाले आणि बडगाम येथे ते कोसळले ज्यात फ्लाइंग ऑफिसर सेखों शहीद झाले. त्यावेळी त्यांचे वय फक्त 26 वर्षे होते.

54th Vijay Diwas
Indian Army: भारतीय लष्करात पाक नागरिक! कोलकाता HC ने सीबीआयला दिले एफआयआर नोंदवण्याचे आदेश

मेजर जनरल इयान कार्डोझो

पाचव्या गोरखा रायफल्सचा भाग असलेले मेजर जनरल इयान कार्डोझो यांचे नाव त्याग आणि धैर्याचे समानार्थी मानले जाते. 1971 च्या युद्धादरम्यान त्यांनी भूसुरुंगावर पाऊल ठेवले आणि पाय गमावला. त्यांच्याकडे ना कोणते औषध होते ना कोणतेही वैद्यकीय साधन, म्हणून त्यांनी स्वतःच्या खुकरीने आपला पाय कापला. भारतीय सैन्यात बटालियन आणि ब्रिगेडचे नेतृत्व करणारे ते पहिले वॉर-डिसेबल्ड अधिकारी ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com