तूफान राडा...! बाईनं रस्त्यावर 'त्याला' खाली पाडलं अन् लाथा-बुक्क्यांनी मारलं; महिलेचा मारामारीचा Video व्हायरल

Viral Video: सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक व्यक्ती रस्त्यावर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. आता ते का भांडत आहेत? भांडण कसे सुरु झाले? हे काही कळत नाही.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करत आहे. सोशल मीडियावर कधी मेट्रोमध्ये तरुण-तरुणींचा डान्स करतानाचा व्हिडिओ तर कधी मारामारीचे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Midea) धूमाकूळ घालत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहून म्हणाल, 'आज की नारी सब पे भारी...'

आधी हा व्हिडिओ पाहा!

मारामारीचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक व्यक्ती रस्त्यावर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. मात्र ते का भांडत आहेत? भांडण कसे सुरु झाले? हे अद्याप कळू शकलेले नाही. पण हो, व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे महिलेने त्या व्यक्तीला चांगलचं दामटलं. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, ती महिला त्या व्यक्तीची मान पकडून पहिल्यांदा जमिनीवर पाडते आणि त्यानंतर ती त्याला लाथा-बुक्क्यांनी मारते. त्याचवेळी, तो व्यक्ती महिलेची (Women) मान धरुन उठण्याचा प्रयत्न करतो.

Viral Video
Viral Video:"15 हजार की शकल और.." Gen-Zचा पगार ऐकून नेटकरी थक्क, '0.1 लाख' कमावणारी तरुणी हिट; पाहा Video

'माणूस कमकुवत होत चालला'

तुम्ही हा पाहिलेला व्हिडिओ X प्लॅटफॉर्मवर @SinghKinngSP नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिले, माणूस कमकुवत होत चालला आहे. मात्र हा व्हायरल व्हिडिओ कधी आणि कुठला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com