आपण भारतातील (India) श्रीमंत लोकांच्या प्रगतीचे, भव्यतेचे, तसेच आर्थिक प्रगतीचे किस्से अनेकदा ऐकतो, वाचतो त्याचबरोबर त्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न देखील करतो. मात्र त्यांच्या उत्तुंग गगनभरारीबरोबरच त्यांच्या वेगाने होणाऱ्या पतनाचे देखील आपण साक्षीदार बनून राहतो. त्यासह काही उद्योगपती आपले अतुलनीय कार्याची पावती देखील देतात.
आज आम्ही तुम्हाला अशा काही भारतीय अब्जाधीशांबद्दल (Billionaires) सांगणार आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यात संपत्ती तर कमावली मात्र त्याचवेगाने त्यांचे पतन देखील झाले असल्याचे पाहिले आहे. अशाच उद्योगपतीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
रामलिंग राजू
1987 मध्ये सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेस लिमिटेडचे संस्थापक रामलिंग राजू (Ramalinga Raju) देशातील चौथ्या क्रमांकाचे आयटी सॉफ्टवेअर निर्यातदार बनले. 2008 मध्ये कंपनीचे मूल्य 2 अब्ज डॉलर्स होते. चांगला नफा दाखवण्यासाठी, राजूनने रिअल इस्टेट मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपनीमध्ये निधीची फेरफार सुरु केली. तथापि, 2008 च्या मंदीनंतर राजू, त्याचे भाऊ आणि इतर 7 जणांना तुरुंगवासाची शिक्षा झाली.
रमेश चंद्र
आयआयटीचे माजी विद्यार्थी रमेश चंद्र (Ramesh Chandra) यांनी 1971 मध्ये युनिटेक नावाने रिअल इस्टेट कंपनीची स्थापना केली. बाजारातील भरभराटीच्या काळात युनिटेक पटकन शीर्षस्थानी पोहोचली, $ 32 अब्ज डॉलर्सची दुसरी सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी बनली. मात्र 2008 मध्ये आलेल्या मंदीमुळे कंपनीचे पतन होण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, चंद्रा यांनी दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला, ज्याला सुरुवातीच्या काळात चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु 2 जी घोटाळ्यातील सहभागामुळे लवकरच ते पुन्हा एकदा मावळले. त्यांचा सहभाग इतका गंभीर होता की, चंद्रा यांची मुले संजय आणि अजय चंद्रा यांना अटक करण्यात आली होती.
रॅनबॅक्सी सिंग ब्रदर्स
रॅनबॅक्सी द सिंग ब्रदर्स (Ranbaxy Singh Brothers) - मालविंदर आणि शिविंदर - यांनी त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेल्या फार्मा कंपनीच्या रानबॅक्सीमध्ये 33.5% हिस्सा विकत घेतला होता. त्यानंतर त्यांच्या भावाने 2008 मध्ये 2 अब्ज डॉलर्समध्ये आपला हिस्सा विकला. त्याच्या सर्वात कुप्रसिद्ध गुंतवणूकींपैकी एक म्हणजे आध्यात्मिक गुरु गुरिंदर सिंग ढिल्लन यांना 3000 कोटी रुपयांचे कर्ज झाले. त्यांच्या भावांवर आतापर्यंत एकूण 500 दशलक्ष कर्ज आहे. रेलिगेअर आणि हेल्थकेअर कंपनी फोर्टिस कडून कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याबद्दल त्यांच्यावर सध्या खटला चालला आहे.
विजय मल्ल्या
एकेकाळी अब्जाधीश असलेले विजय मल्ल्याला (Vijay Mallya) वयाच्या 28 व्या वर्षी वडिलांचा दारुचा व्यवसाय वारसाहक्काने मिळाला आणि त्याने कोट्यवधी डॉलर या व्यवसायातून मिळवले. मल्ल्याने किंगफिशर एअरलाइन्ससह एअरलाईन क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र आर्थिक दिवाळखोरीकडे प्रवास सुरु झाला. ज्याने 2008 च्या मंदीच्या काळात मोठा फटका बसला होता. थोड्याच वेळात, मल्ल्याच्या 9,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर तो भारत सोडून पळून गेला आणि तो सध्या यूकेमध्ये आश्रीत आहे.
नीरव मोदी
लक्झरी डायमंड ज्वेलर्स नीरव मोदी (Nirav Modi) हे एकेकाळी एक सुप्रसिद्ध नाव होते. तथापि, 2018 मध्ये घोटाळ्याची बातमी आल्यानंतर तो देश सोडून निघून गेला. नीरव मोदीने 7 वर्षात पीएनबीमध्ये 14,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड झाले. ही बातमी समोर आल्यानंतर मोदीने भारत सोडला आणि लंडनमध्ये आश्रय घेतला. सध्या त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.