देशातील या 5 राज्यांमध्ये कोरोनाचा कहर, 'दक्षता बाळगा...'

तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, (Telangana) कर्नाटक आणि महाराष्ट्र या देशातील पाच राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
Corona
CoronaDainik Gomantak
Published on
Updated on

तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, (Telangana) कर्नाटक आणि महाराष्ट्र या देशातील पाच राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याबाबत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने या राज्यांना एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये सखोल निरीक्षण, अधिक टेस्टींग, ट्रॅकिंग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात लिहिले आहे की, 'राज्याने दक्षता बाळगणे आवश्यक आहे. संसर्गाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असल्यास कारवाई करा' The number of corona patients is once again increasing in 5 states of the country

ते पुढे म्हणाले, ''या सामूहिक प्रयत्नात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. भारतात 84 दिवसांनंतर कोरोनाचे 4,000 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत कोरोनाची (Corona) लागण झालेल्या लोकांची संख्या 4,31,68,585 झाली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 21,177 वर पोहोचली आहे.''

Corona
देशात कोरोना संसर्गाचा आलेख चढाच; मार्चनंतर सर्वाधिक नवे रुग्ण

गेल्या 24 तासांत 4,041 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला, ज्यामुळे संसर्गामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या 5,24,651 झाली. त्याचबरोबर देशात कोविड-19 साठी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 21,177 वर पोहोचली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.05 टक्के आहे. त्याच वेळी, संसर्गातून बरे झालेल्यांचा राष्ट्रीय दर 98.74 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत संसर्गामुळे मृत्यू झालेल्या दहा रुग्णांपैकी सहा केरळमधील, दोन दिल्लीतील आणि महाराष्ट्र (Maharashtra) आणि नागालँडमधील (Nagaland) प्रत्येकी एक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com