Viral Video: "कुछ लीक हो रहा है यार !" पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी अचानक आला आवाज, ट्विटरवर रंगल्या चर्चा

PM Narendra Modi At G20 : आयएनसी टीव्हीने केलेल्या या पोस्टनंतर ट्विटरवर खूप मजेशीर प्रतिक्रीया उमटत आहेत. काहीजण यावरून कॉंग्रेसवर टीका करत आहे. तर काहीजण मोदी आणि भाजपला टार्गेट करत आहेत.
G20|PM Narendra Modi
G20|PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

"Something is leaking, man!" Mysterious voice during Prime Minister Narendra Modi's speech at G20 Summit:

यंदा भारत G20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे. आज, शनिवारी, शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी, जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून जागतिक मुद्द्यांवर विचारमंथन केले.

ही शिखर परिषद दोन दिवस चालणार आहे. अजेंड्यात हवामान बदल, कर्ज, अन्न सुरक्षा, शाश्वतता आणि भू-राजकीय तणाव यावर चर्चा समाविष्ट आहे. त्याचबरोबर भारताने यंदाच्या शिखर परिषदेची थीम 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' अशी ठेवली आहे.

"कुछ लीक हो रहा है यार"

दरम्यान G20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान एका आवाजामुळे खळबळ उडाली असून, सर्वत्र याचीच चर्चा आहे.

पंतप्रधान मोदी बोलत असताना कंट्रोल रूममधून आवाज आला, "कुछ लीक हो रहा है यार"! अशा आशयाचे ट्विट विरोधी पक्ष कॉंग्रेसने INC TV ट्विटर हॅन्डलवरुन केले आहे. तसेच याचा व्हिडिओही शेअर केला आहे.

आयएनसी टीव्हीने केलेल्या या पोस्टनंतर ट्विटरवर खूप मजेशीर प्रतिक्रीया उमटत आहेत. काहीजण यावरून कॉंग्रेसवर टीका करत आहे. तर काहीजण मोदी आणि भाजपला टार्गेट करत आहेत.

G20|PM Narendra Modi
Viral Video: विधवा असल्याने की मद्यपानामुळे? पन्ना राजघराण्याच्या महाराणीला मंदिराबाहेर काढल्यामुळे वादंग

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

G20 च्या पहिल्या दिवशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत हा विविध श्रद्धा, अध्यात्म आणि परंपरांचा देश आहे. जगातील अनेक प्रमुख धर्मांनी येथे जन्म घेतला आहे. जगातील प्रत्येक धर्माला येथे आदर आहे.

"लोकशाहीची माता" म्हणून, संवादावर आणि लोकशाही विचारसरणीवरचा आपला विश्वास अनादी काळापासून अढळ आहे. आपले जागतिक वर्तन 'वसुधैव कुटुंबकम' या मूळ भावनेवर आधारित आहे, म्हणजेच जग हे एक कुटुंब आहे. जगाचा विचार करण्याची ही भावना आहे. एक कुटुंब म्हणून, प्रत्येक भारतीयाला एक पृथ्वीच्या जबाबदारीच्या भावनेने जोडते.

भारताच्या विनंतीवरून आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने, संपूर्ण जग यावर्षी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करत आहे, आणि हे हवामान सुरक्षिततेच्या भावनेशी देखील जोडलेले आहे.

G20|PM Narendra Modi
टोलवरून वाद, कॅब चालकाने आमदाराला धमकावत मधेच उतरवले

दोन दिवस चालणाऱ्या या G20 परिषदेशाठी डझनभर जागतिक नेते दिल्लीत एकत्र उपस्थित आहेत. यावर्षी भारत G20 परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे.

भारताच्या आवाहनावर, आफ्रिकन युनियनचा प्रथमच G20 मध्ये समावेश करण्यात आला आहे. G20 परिषदेसाठी दिल्लीतील भारत मंडपम आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आला असून त्यात सर्व आधुनिक सुविधा आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com