Viral Video: विदेशी महिला पर्यटकांसोबत लज्जास्पद कृत्य; तरुणाचा व्हायरल व्हिडिओ पाहून संतापले लोक

Jaipur Instagram Reels: राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एक तरुण पर्यटकांना त्रास देत इन्स्टाग्रामवर रील्स बनवत होता.
Jaipur Instagram Reels
Jaipur Instagram ReelsDainik Gomantak

Jaipur Instagram Reels: राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एक तरुण पर्यटकांना त्रास देत इन्स्टाग्रामवर रील्स बनवत होता. एवढचं नाहीतर विदेशी महिला पर्यटकांची ‘रेट लिस्ट’ बनवून त्यांचा व्हिडिओ व्हायरल करत होता. @guru__brand0000 असे या तरुणाचे इन्स्टाग्राम यूजरनेम आहे. त्याने अनेक रील्स बनवले, ज्यामध्ये तो महिला पर्यटकांना त्रास देताना दिसत आहे. काही व्हिडिओ महिला पर्यटकांबाबत अतिशय आक्षेपार्ह आहेत. एका X यूजरने या तरुणाच्या आक्षेपार्ह व्हिडिओवर संताप व्यक्त करत लिहिले की, ‘’देशातील अशा लोकांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन होते. पोलिसांनी तात्काळ अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे.’’

अश्लील टिप्पणी

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण पहिल्यांदा चार महिला पर्यटकांजवळ जातो आणि त्यांचा अपमान करत ‘रेट लिस्ट’ बनवतो. तो व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हणताना दिसतोय की, "गाइज, तुम्हाला या महिला 150 रुपयांमध्ये मिळू शकतात." एवढ्यावरच न थांबता तो एकामागून एक महिलांकडे बोट दाखवत म्हणतो की, "ही तुम्हाला 150 रुपयांत मिळेल, ही दुसरी 200 रुपयांत, ही तिसरी 500 रुपयांत आणि ही चौथी 300 रुपयांत मिळेल.’’

दुसऱ्या व्हिडिओमध्ये हा तरुण एका पर्यटक जोडप्याला त्रास देताना दिसत आहे. त्या जोडप्याकडे निर्देश करुन तो म्हणतो की, ‘’गाइज, ही माझी बायको आहे.’’ मग तो त्या माणसाकडे जातो आणि म्हणतो की, "हा माझा मेव्हणा आहे. कसा दिसतोय माझा मेव्हणा?"

Jaipur Instagram Reels
Viral Video: PM मोदींबाबत आरजेडी नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; भाजपने व्हिडिओ शेअर करत ECI कडे केली तक्रार

दरम्यान, या तरुणाचे इन्स्टाग्राम प्रोफाईल पाहता, तो काही वर्षांपासून जयपूरमधील पर्यटकांना त्रास देऊन इन्स्टाग्राम रील्स बनवत असल्याचे समोर आले आहे. तो अनेकदा त्याचा कॅमेरा त्यांच्याकडे रोखून ठेवतो आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवतो. याशिवाय, त्याने या रील्स पोस्ट देखील केल्या आहेत, ज्यात तो बाइक स्टंट करतानाही दिसत आहे.

सोशल मीडियावर लोक संतापले

दुसरीकडे, सोशल मीडिया यूजर्संनी जयपूर पोलिसांना या तरुणाच्या X वरील व्हिडिओखाली टॅग करत तात्काळ कारवाईची मागणी केली. अनेक यूजर्सचा दावा आहे की, या तरुणाने आपल्या अशा वागण्याने जयपूरचे नाव खराब केले आहे. यूजर्संच्या पोस्टवर प्रतिक्रीया देताना जयपूर पोलिसांकडून सांगण्यात आले की, "सर, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाबाबत कळवण्यात आले आहे, लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई केली येईल."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com