Air India: दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या विमानात अचानक बसला जोरदार हादरा, सात प्रवासी जखमी

एअर इंडियाच्या सिडनी येथील विमानतळ व्यवस्थापकाने आगमनानंतर जखमी प्रवाशांसाठी वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली.
Air India
Air India Dainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या B787-800 विमानाचा अचानक जोरदार हादरा बसल्याने सात प्रवासी जखमी झाले आहेत. मंगळवारी (16 मे) ही घटना घडली. विमान अचानक हादरल्यामुळे काही प्रवाशांना दुखापत झाली होती पण त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. असे DGCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली आहे.

दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या फ्लाइट दरम्यान सात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, केबिन क्रूने प्रवाशांमधील डॉक्टर आणि नर्सच्या मदतीने फ्लाइटमधील प्रथमोपचार किटचा वापर करून प्राथमिक उपचार केले.

एअर इंडियाच्या सिडनी येथील विमानतळ व्यवस्थापकाने आगमनानंतर जखमी प्रवाशांसाठी वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली. केवळ तीन प्रवाशांनी वैद्यकीय मदतीची गरज भासली.

16 मे 2023 रोजी दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये अचानक जोरदार हादरे बसल्याने काही प्रवाशांना दुखापत झाली. परंतु विमानाने सिडनीमध्ये सुरक्षित लँडिंग केले. यानंतर प्रवाशांना वैद्यकीय मदत देण्यात आली. असे एअर इंडियाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे.

Air India
Goa Krishi Mahotsav 2023: गोव्यात शुक्रवारपासून तीन दिवस राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

विमानातच प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर सिडनी विमानतळावर उपचाराची व्यवस्थाही करण्यात आली होती, मात्र केवळ तीन प्रवाशांच उपचाराची गरज भासली.

दरम्यान, एअर इंडियाचे विमान नागपूरहून मुंबईला जात असताना, या महिन्याच्या सुरुवातीला एका विंचूने एका प्रवाशाला चावा घेतला होता. याशिवाय विमानात जिवंत पक्षी आणि उंदीर सापडल्याची अनेक उदाहरणे सापडली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com