Horoscope: 'या' राशींना व्यवसायात मिळणार यश, संध्याकाळी मिळणार मोठी बातमी; धनलक्ष्मी योग करणार चमत्कार

1 September Horoscope: सोमवार, १ सप्टेंबर रोजी चंद्रमा वृश्चिक राशीनंतर धनु राशीत गोचर करीत आहे. या गोचरादरम्यान चंद्राचा संचार ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्रांत होत असून चंद्रावर मंगळाची चतुर्थ दृष्टि पडणार आहे.
Horoscope News
Horoscope Dainik Gomantak
Published on
Updated on

सोमवार, १ सप्टेंबर रोजी चंद्रमा वृश्चिक राशीनंतर धनु राशीत गोचर करीत आहे. या गोचरादरम्यान चंद्राचा संचार ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्रांत होत असून दुपारनंतर चंद्रावर मंगळाची चतुर्थ दृष्टि पडणार आहे.

या स्थितीत चंद्र-मंगळाच्या संयोगाने धनलक्ष्मी योगाची निर्मिती होत आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी तयार झालेला हा योग काही राशींसाठी लाभदायक तर काहींसाठी मिश्र फळ देणारा ठरणार आहे.

ज्योतिष गणनेनुसार, मेष, मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस विशेष लाभदायक आहे. कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात त्यांना चांगले यश मिळेल, आत्मविश्वास वाढेल.

आर्थिक दृष्ट्या या राशींना विशेष समाधान मिळेल. मेष राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळणार असून त्यांच्या प्रयत्नांपेक्षा अधिक यश मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल.

वृषभ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असून जीवनसाथीबरोबर जिव्हाळ्याचे क्षण व्यतीत होतील. बँकिंग किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये यश मिळेल. मिथुन राशीला निर्णयक्षमता आज फायद्याची ठरणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातही प्रगतीची चिन्हे आहेत.

कर्क राशींसाठी दिवसाचा पहिला भाग तणावपूर्ण, तर दुसरा भाग अनुकूल ठरणार आहे. विदेशातील कामकाजात शुभवार्ता मिळू शकते. सिंह राशींसाठी आजचा दिवस विशेषत्वाने लाभदायक आहे. सरकारी कामांमध्ये यश मिळेल आणि उत्पन्नात वाढ होईल.

कन्या राशीच्या लोकांना समाजात मान-सन्मान मिळणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील. तुला राशीला आयात-निर्यात किंवा व्यवसायातून फायदा होईल. वृश्चिक राशीसाठी दिवस मिश्र आहे, खर्च वाढण्याची शक्यता असून संयमाने वागण्याचा सल्ला आहे.

Horoscope News
Horoscope: मोरया! आनंदाची बातमी मिळणार; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

धनु राशीत शुभकार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. मकर राशीच्या लोकांनी वाणी आणि रागावर संयम ठेवणे आवश्यक आहे. कुंभ राशीसाठी आजचा दिवस तणावरहित ठरणार आहे. कार्यक्षेत्रात नवे संधी मिळतील.

मीन राशीच्या लोकांना कुटुंबातील ज्येष्ठांचा मार्गदर्शन लाभेल. अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि वाहनसुखही लाभेल.

Horoscope News
Rashi Bhavishya 1 September 2025: पैशाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या,आत्मविश्वास उंचावेल; चांगल्या बातम्या मिळतील

आजच्या दिवशी तयार झालेला चंद्र-मंगळाचा धनलक्ष्मी योग अनेक राशींसाठी शुभशकुन ठरणार आहे, मात्र काही राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे ज्योतिष तज्ज्ञांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com