SEBEX 2 Explosive: भारताने बनवले जगातील सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर स्फोटक! TNT पेक्षा दुप्पट घातक; नौदलाने घेतली चाचणी

Most Powerful Non-Nuclear Explosive: भारताने एक स्फोटक पदार्थ तयार केला आहे, जो ट्रायनिट्रोटोल्युएन (TNT) पेक्षा दुप्पट घातक आहे. त्याला SEBEX-2 असे नाव देण्यात आले आहे.
SEBEX 2 Explosive: भारताने बनवले जगातील सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर स्फोटक! TNT पेक्षा दुप्पट घातक; नौदलाने घेतली चाचणी
Most Powerful Non-Nuclear ExplosiveDainik Gomantak

भारताने एक स्फोटक पदार्थ तयार केला आहे, जो ट्रायनिट्रोटोल्युएन (TNT) पेक्षा दुप्पट घातक आहे. त्याला SEBEX-2 असे नाव देण्यात आले आहे. हे जगातील सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर स्फोटकांपैकी एक आहे.

वृत्तानुसार, यामुळे भारताच्या स्फोटक क्षमतेत क्रांती होऊ शकते. बॉम्ब, तोफखाना आणि वॉरहेड्समध्ये सेबेक्स-2 चा वापर केल्याने त्यांची विध्वंसक क्षमता अनेक पटींनी वाढेल. नवीन स्फोटकांचे वजनही खूप कमी आहे. SEBEX-2 चे फॉर्म्युलेशन देखील भारतीय नौदलाने (Indian Navy) चाचणी केल्यानंतर प्रमाणित केले आहे.

संरक्षण निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत नौदलाने SEBEX-2 ची चाचणी केली. यामुळे विद्यमान शस्त्रांची क्षमता अनेक पटींनी वाढते, जगभरातील सैन्य या नवीन स्फोटकांचा वापर करु इच्छितात. 'मेक इन इंडिया' अंतर्गत इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेडने हे स्फोटक तयार केले आहे.

SEBEX 2 Explosive: भारताने बनवले जगातील सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर स्फोटक! TNT पेक्षा दुप्पट घातक; नौदलाने घेतली चाचणी
ISRO Successfully Tests 3D-Printed Rocket Engine: इस्रोने रचला इतिहास, 3D प्रिंटेड लिक्विड रॉकेट इंजिनची चाचणी यशस्वी

SEBEX-2 TNT पेक्षा दुप्पट प्राणघातक

स्फोटकाची घातकता टीएनटीशी तुलना करुन मोजली जाते. टीएनटी म्हणजेच ट्रिनिट्रोटोल्युएन हे सर्वात लोकप्रिय स्फोटक आहे. 1 ग्रॅम टीएनटीच्या स्फोटातून बाहेर पडणारी ऊर्जा अंदाजे 4000 जूल असते. एक मेट्रिक टन (1,000 किलो) TNT च्या स्फोटाने सोडलेल्या ऊर्जेचे प्रमाण TNT समतुल्य असे म्हणतात. TNT समतुल्य जितके जास्त तितके ते अधिक प्राणघातक असतात.

भारताच्या (India) नॉन-न्यूक्लियर ब्रह्मोस क्षेपणास्त्रमध्ये सर्वात घातक विस्फोटक वापरले जाते, ज्याची TNT समतुल्यता 1.50 आहे. जगातील बहुतेक वॉरहेड्समध्ये 1.25-1.30 दरम्यान TNT समतुल्यता असते. SEBEX-2 चे TNT समतुल्य 2.01 आहे, म्हणजे ते आतापर्यंतचे सर्वात घातक अपारंपरिक स्फोटक आहे.

SEBEX 2 Explosive: भारताने बनवले जगातील सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर स्फोटक! TNT पेक्षा दुप्पट घातक; नौदलाने घेतली चाचणी
ISRO: अडचण झाली दूर; गगनयानचे चाचणी प्रक्षेपण यशस्वीरित्या पूर्ण

आणखी घातक स्फोटके बनवण्याची तयारी

नौदलाने यापूर्वीच SITBEX 1 प्रमाणित केले आहे, जे इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडचे ​​पहिले थर्मोबॅरिक स्फोटक आहे. SITBEX 1 मध्ये मोठा विस्फोट टाइम असतो आणि मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण करतो.

अहवालानुसार, शत्रूचे बंकर आणि इतर ठिकाणांना लक्ष्य करण्यात ते प्रभावी आहे. इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सेबेक्स-2 बनवणारी कंपनी आणखी एका स्फोटकावरही काम करत आहे. ते स्फोटक TNT पेक्षा 2.3 पट जास्त घातक असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com