Video: 'पतली कमरिया' वर शाळकरी मुलांचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले...

Viral Video: बालपणीचे दिवस किती छान असतात. विशेषतः शाळेच्या काळातील आठवणी या प्रत्येकाच्या आयुष्यातील मौल्यवान आठवणी असतात.
Video
VideoDainik Gomantak

Viral Video: बालपणीचे दिवस किती छान असतात. विशेषतः शाळेच्या काळातील आठवणी या प्रत्येकाच्या आयुष्यातील मौल्यवान आठवणी असतात.

शाळेतील मित्रांसोबत केलेली धमाल-मस्ती कायमच लक्षात राहते. शाळेचे दिवस सरले तरी आपल्याला मित्रांची आणि त्या वेळेची खूप आठवण येते.

लोक नेहमी म्हणतात की, शाळेचे दिवस काय होते... असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुले स्कूल बसमध्ये मस्ती करताना दिसत आहेत.

शाळकरी मुले नाचतात

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रस्त्यावरुन वरात निघताना दिसत आहे. वरातीमध्ये वराची गाडी पुढे आहे आणि डीजे मागे वाजत आहे. त्याच्या मागे महिला (Women) डान्स करताना दिसत आहेत. डीजेमध्ये "पतली कमरिया बोले हाय हाय..." हे गाणं वाजत आहे. वरातीमध्ये सहभागी लोक गाण्यावर नाचत आहेत.

दुसरीकडे, वरातीमुळे रस्त्यावर निर्माण जाममध्ये एक स्कूल बस डीजेसमोर थांबते. मग काय स्कूल बसमधील मुलांना गोंधळ घालण्याची संधी मिळाली. जोरात वाजणारे गाणे ऐकून स्कूल बसमधील सर्व मुले आपापल्या जागेवरुन नाचू लागतात.

मुलांना नाचताना पाहून, रस्त्याने चाललेल्या वरातीमधील महिलाही अजून जोरदार नाचायला सुरुवात करतात. लग्नात व्हिडिओग्राफी करणारी व्यक्ती त्या मुलांचा व्हिडिओ बनवते. त्यानंतर जाम उघडतो आणि स्कूल बस सुरु होते.

व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सच्या चेहऱ्यावर हसू उमटले

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @darshanvpathak नावाच्या युजरने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ 12 हजार लोकांनी पाहिला आहे, तर 500 ​​जणांनी त्याला लाईक केले आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सना त्यांचे बालपणीचे दिवस आठवले आणि ते कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या बालपणीच्या आठवणी सर्वांसोबत शेअर करत आहेत.

एका यूजरने लिहिले - "बालपण", आयुष्यातील सर्वात सोनेरी काळ. ज्यामध्ये दुसऱ्या यूजरने लिहिले - ही सर्व क्रांतिकारी मुले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com