Election Commission: निवृत्त IAS अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती

Election Commission: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला संमती दिली आहे.
Election Commission
Election CommissionDainik Gomantak

Election Commission: माजी आयएएस अधिकारी अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला संमती दिली आहे. भारत सरकारने एका निवेदनात म्हटले की, राष्ट्रपतींनी IAS (निवृत्त) अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. जारी केलेल्या आदेशात म्हटले की, त्यांना तातडीने हे पद स्वीकारावे लागेल. अरुण गोयल हे पश्चिम बंगाल केडरचे 1985 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

दरम्यान, अरुण गोयल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्यासह निवडणूक मतदान पॅनेलमध्ये सामील होतील. राजीव कुमार हे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांनी या वर्षी मे महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्त झालेल्या सुशील चंद्रा यांची जागा घेतली.

Election Commission
Election Commission: ''मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी''

दुसरीकडे, गोयल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याच्या एका दिवसानंतर सरकारने (Government) ही घोषणा केली. गोयल यांनी अधिकृतपणे निवृत्त होण्याच्या एक महिना आधी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com