India Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी भारताचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भारत जोडो यात्रा संपवून संसद भवनात हजेरी लावली आहे.
राहूल गांधी यांनी संसद भवनात प्रवेश करत असताना त्यांच्या पक्षाच्या सहकारी खासदारांनी त्यांच्या समर्थनार्थ भारत जोडोच्या घोषणा दिल्या. राहुल गांधी काल श्रीनगरहून दिल्लीला परतले होते.
अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर केला
अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाच्या आर्थिक वर्ष 2023-24 साठी भारताचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अमृत कालमध्ये हा भारताचा पहिला अर्थसंकल्प आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही एका समृद्ध आणि सर्वसमावेशक भारताची कल्पना करतो ज्यामध्ये विकासाची फळे सर्वांपर्यंत पोहोचतील.
त्या पुढे म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. आम्ही 28 महिन्यांसाठी 80 कोटींहून अधिक लोकांना मोफत धान्य पुरवठा केला.
अर्थमंत्री म्हणाल्या की, जागतिक आव्हानांच्या काळात भारताचे G20 अध्यक्षपद आम्हाला आर्थिक व्यवस्थेतील भारताची भूमिका मजबूत करण्याची अनोखी संधी दिली.
भारत जोडो यात्रेचा शेवट
तब्बल पाच महिन्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची सोमवारी ३० जानेवारीला सांगता झाली. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी यात्रा संपल्यानंतर आयोजित सभेत सांगितले की, ही यात्रा मी पक्षासाठी आणि स्वत:साठी नाही तर देशातील जनतेसाठी काढली आहे. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राहुल गांधींना आशेचा किरण असल्याचे म्हटले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.