President Draupadi Murmu
President Draupadi MurmuDainik Gomantak

President Draupadi Murmu: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला द्रौपदी मुर्मू करणार देशाला संबोधित

President Draupadi Murmu: हर घर तिरंगा अभियनातंर्गत देशवासींयाना आपापल्या सोशल मिडिया अकाउंटच्या डिपीवर तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते.

President Draupadi Murmu: भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याबरोबरच विविध अभियानदेखील राबवले जात आहेत. आता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संबोधन रात्री 7 वाजता आकाशवाणीच्या राष्ट्रीय नेटवर्कवरुन प्रसारित केले जाणार आहे. दूरदर्शनवरील सर्व चॅनेलवर सुरुवातीला हिंदी आणि नंतर इंग्रजीमध्ये प्रसारण केले जाणार आहे.

दरम्यान, संपूर्ण देशभरात राजधानी दिल्लीपासून ते जम्मू काश्मीरपर्यत संपूर्ण देशात तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा अभियनातंर्गत देशवासींयाना आपापल्या सोशल मिडिया अकाउंटच्या डिपीवर तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते.

महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदींनी फक्त आवाहन केले नाही तर स्वत:च्या सोशल मिजियावरचा डीपीदेखील बदलला आहे. त्यांनी आपल्या घरावर लावलेल्या तिरंग्याबरोबर फोटो घेऊन तो www.harghartiranga.com या वेबसाइटवर अपलोड करण्यास सांगितले आहे.

President Draupadi Murmu
घटस्फोटाची केस सुरू असताना वेगळे राहण्यासाठी कारणांची गरज नाही; हाय कोर्टाचा निर्वाळा

77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्यावर मोठा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने, लाल किल्ल्यावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सरकारने पीएम किसान योजनेच्या लाभार्थियांसोबतच 1800 पाहुण्यांना आमंत्रण दिले आहे. याशिवाय, देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 75 जोडप्यांना पारंपारिक वेशभूषेत आमंत्रित केले आहे.

आता 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात काय मुद्दे मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com