PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

PM Modi Interview: समान नागरी कायद्याबाबत (Uniform Civil Code) एका मुलाखतीत बोलताना पंतप्रधान मोदींनी गोव्यात लागू असलेल्या समान नागरी कायद्याबद्दल सांगितले.
PM Modi Interview
PM Modi InterviewDainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi Interview: लोकसभा निवडणुकीतील चार टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. मतदानाचे तीन टप्पे अद्याप बाकी आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक प्रचार सभा, रोड शो यांचा धडाका लावला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी समान नागरी कायद्याबाबत मोठं वक्तव्य केलं. समान नागरी कायद्याबाबत (Uniform Civil Code) एका मुलाखतीत बोलताना पंतप्रधान मोदींनी गोव्यात लागू असलेल्या समान नागरी कायद्याबद्दल सांगितले.

आता लोक म्हणू लागले आहेत की, वन नेशन-वन लॅंग्वेज, वन नेशन-वन ड्रेस, वन नेशन-वन फूड या दिशेने भारताची सध्याची वाटचाल सुरु आहे. यावर तुमचे मत काय आहे? यावर पंतप्रधान मोदी यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, ‘’असे म्हणणाऱ्यांना तुम्ही हे नॅरेटिव्ह कुठून आणले असा उलट सवाल केला पाहिजे. त्यांनी UCC बद्दल जाणून घेतले आहे का? UCC म्हणजे काय? या देशाकडे यासंबंधीचे उदाहरण आहे, गोव्यात यूसीसी आहे. मला सांगा, गोव्यातील लोक एकसारखे कपडे घालतात का? गोव्यातील लोक एकाच प्रकारचे फूड खातात का? या लोकांनी समान नागरी कायद्याबद्दल पोरखेळ लावला आहे का?’’

PM Modi Interview
PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ‘आज तक’शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची अगदी दिलखुलास उत्तरे दिली. विरोधकांच्या नॅरेटिव्हवरही पंतप्रधान मोदी मोकळेपणाने बोलले.

दरम्यान, देशात गोवा हे एकमेव राज्य आहे, जिथे समान नागरी कायदा लागू आहे. देशात सुरु झालेल्या यूसीसीच्या चर्चेनंतर अनेकजण गोव्यातील या कायद्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या कायद्यातील महत्वाच्या तरतुदींविषयी पॉईट्समध्ये जाणून घेऊया...

गोव्यातील या कायद्यानुसार सर्व धर्मांसाठी एकच फॅमिली लॉ लागू आहे. मुस्लीमांना 4 लग्ने करता येत नाहीत. तसेच मुस्लीम धर्मातील तिहेरी तलाकदेखील येथे चालत नाही. येथे कोर्टातूनच घटस्फोट होऊ शकतो.

PM Modi Interview
PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

गोवा सिव्हिल कोडमधील महत्वाच्या तरतुदी

1. गोवा सिव्हिल कोडनुसार (GCC) गोव्यात लग्नानंतर पती-पत्नीची जी काही संपत्ती असेल त्यात दोघेही समान वाटेकरी होतात. जर घटस्फोट झाला तर पत्नीला अर्धी संपत्ती मिळते.

2. या कायद्यानुसार गोव्यात आई-वडीलांना त्यांची अर्धी संपत्ती त्यांच्या अपत्यांना द्यावी लागते. त्यात मुलांसह मुलींचा वाटाही समान असतो.

3. गोव्यात या कायद्यानुसार लग्नाची दोन टप्प्यात नोंदणी होते. पहिल्या टप्प्यात औपचारीक लग्नाची घोषणा केली जाते. यावेळी नवरा-नवरीसोबत त्यांचे आई-वडील असणे गरजेचे असते. (जर मुलीचे वय 21 पेक्षा कमी असेल तर) याशिवाय जन्मदाखल, रहिवासी दाखला आणि नोंदणीची गरज असते. दुसऱ्या टप्प्यात लग्नाची नोंदणी होते. त्यात नवरा-नवरीशिवाय दोन साक्षीदार असावे लागतात.

4. व्यक्ती कुठल्याही धर्माची असो. तिला एकापेक्षा अधिक विवाह करता येत नाही.

5. गोव्यात प्राप्तीकर लावताना जर पती-पत्नी दोघेही कमावते असतील तर पती-पत्नीच्या एकत्रित कमाईवर (उत्पन्नावर) प्राप्तीकर लावला जातो.

6. जर एखाद्या लग्नात पत्नी 30 वर्षांपर्यंत मूल जन्माला घालू शकली नाही तर त्या स्थितीत संबंधित पतीला दुसऱ्या विवाहाची परवानगी मिळते. तथापि, या तरतुदीचा लाभ 1910 नंतर कुणालाही दिला गेलेला नाही, असे सांगितले जात आहे.

गोव्यात पोर्तुगीज काळातच हा कायदा लागू करण्यात आला होता. सुरवातीला 1867 मध्ये पहिल्यांदा हा कायदा पोर्तुगालमध्ये बनला. 1869 मध्ये तो पोर्तुगालच्या सत्तेखालील भागात लागू केला गेला.

1962 मध्ये पोर्च्युगीस सिविल कोडला भारताने गोवा, दमन आणि दीव अॅडमिनिस्ट्रेशन अॅक्ट, 1962 च्या सेक्शन 5 (1) मध्ये स्थान दिले. दरम्यान, पोर्तुगालने 1966 मध्ये या कायद्यात बदल करुन सुधारित सिव्हिल कोड लागू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com