पंतप्रधान मोदींनी नॅनो युरिया प्लांट देशाला केला समर्पित; शेतकऱ्यांची शक्ती वाढणार

2014 मध्ये सरकार आल्यावर युरियाचे 100 टक्के निम कोटिंग केले
pm modi inaugurated the country first nano urea plant
pm modi inaugurated the country first nano urea plant
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुजरातमधील गांधीनगरमधील कलोल येथे देशातील पहिल्या नॅनो युरिया प्लांटचे उद्घाटन केले.इफको नॅनो युरिया प्लांट 175 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. यामुळे कृषी उत्पादन, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढेल. जल आणि हवेचे प्रदूषण कमी होईल. त्यामुळे शेतकरी सुरक्षित राहतील. 'सहकार से समृद्धी' कार्यक्रमात पोहोचल्यानंतर पीएम मोदींनी या प्लांटचे उद्घाटन केले आणि ते देशाला समर्पित केले.यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, नॅनो युरियाची सुमारे अर्धा लिटर बाटली, शेतकऱ्याची एक पोती युरियाची गरज पूर्ण करेल.

येत्या काळात असे आणखी 8 प्लांट उभारले जाणार आहेत. 2014 मध्ये सरकार आल्यावर युरियाचे 100 टक्के निम कोटिंग केले.त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना पुरेसा युरिया उपलब्ध झाला.भारत परदेशातून जो युरिया आयात करतो, त्या युरियाच्या 50 किलोच्या बॅगची किंमत 3500 रुपये आहे, परंतु देशात तीच युरियाची पिशवी शेतकर्‍याला केवळ 300 रुपयांना दिली जाते. म्हणजेच आपले सरकार युरियाच्या एका पोत्यावर ३२०० रुपयांचा भार उचलते.(pm modi inaugurated the country first nano urea plant)

pm modi inaugurated the country first nano urea plant
पीएम-किसान’ योजनेच्या ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ

पुढे मोदी म्हणाले की, आम्ही यूपी, बिहार, झारखंड, ओडिशा आणि तेलंगणामधील 5 बंद असलेले खत कारखाने पुन्हा सुरू करण्याचे काम सुरू केले. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही आवश्यक आहे ते आम्ही करू आणि देशातील शेतकऱ्यांची शक्ती वाढवत राहू.तसेचदेशातील शेतकऱ्याला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी खतामध्ये १.६० लाख कोटी रुपयांची सबसिडी दिली. शेतकऱ्यांना हा दिलासा यंदा 2 लाख कोटी रुपयांहून अधिक असणार आहे.

पीएम मोदी म्हणाले की, आज लहान शेतकऱ्यांना प्रत्येक प्रकारे सक्षम केले जात आहे. छोट्या व्यापाऱ्यांना समान संधी दिली जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृताच्या भावनेशी सहकार्याची भावना जोडण्यासाठी आम्ही सतत पुढे जात आहोत. याच उद्देशाने केंद्रात सहकारासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले. देशात सहकारी आधारित आर्थिक मॉडेलला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com