PFI ने वाढवले सुरक्षा यंत्रणांचे टेन्शन, टार्गेट किलिंगची यादी तयार; बिहारमध्ये 10 ट्रेनिंग कॅम्प

Target killing list of PFI: PFI आता सशस्त्र प्रशिक्षणाऐवजी महत्त्वाच्या लोकांना टार्गेट करुन ठार मारण्याची योजना आखत आहे.
PFI
PFIDainik Gomantak

PFI Training Camps In Bihar: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या नव्या योजनेमुळे देशातील सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. PFI आता सशस्त्र प्रशिक्षणाऐवजी महत्त्वाच्या लोकांना टार्गेट करुन ठार मारण्याची योजना आखत आहे.

बिहार मॉड्यूलची चौकशी करणार्‍या NIA ला खळबळजनक माहिती मिळाली आहे की, सरकारच्या कारवाईनंतर PFI आता केवळ धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी टार्गेट किलिंगवर काम करत आहे.

गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार बिहार (Bihar) पीएफआय मॉड्यूलमधील आरोपी याकूब हा या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. गुप्तचर संस्थेच्या तपासात असे आढळून आले आहे की, बिहारच्या चकिया भागात राहणारा याकूब गेल्या दीड वर्षांपासून सशस्त्र प्रशिक्षण देत होता, मात्र पीएफआयवर बंदी येताच त्याने आपला मार्ग बदलला.

PFI
NIA Action Against PFI : भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी NIA ची मोठी कारवाई! 20 PFI सदस्यांवर आरोपपत्र दाखल

पीएफआयने टार्गेटची यादी तयार केली होती

पीएफआयच्या या बिहार मॉड्यूलने याकुबला ज्या महत्त्वाच्या लक्ष्यांसाठी शस्त्रे आणि दारुगोळा पोहोचवला जात होता त्यांची यादी तयार केली होती. वास्तविक, बंदीनंतर पीएफआय पुन्हा आपली उपस्थिती नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे.

दुसरीकडे, तपास यंत्रणांच्या तपासात असेही समोर आले आहे की, गेल्या दीड वर्षात याकुबने बिहारमध्ये सुमारे 1 डझन प्रशिक्षण शिबिरे चालवली आहेत. फुलवारी शरीफ, बेतिया, दरभंगा, मोतिहारी, कटिहार, पूर्णिया, अररिया, मधुबनी आणि बिहार शरीफ येथे ही शिबिरे घेण्यात आली.

PFI
PFI Ban: देशभरात 'पीएफआय''च्या 1400 कार्यकर्त्यांवर गुन्हे

गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॅम्प चालवणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर याकूब आणि त्याच्या साथीदारांनी भूमिगत होऊन शस्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली. गेल्या 3 दिवसात, NIA ने PFI बिहार फुलवारी शरीफ मॉड्यूलशी संबंधित 3 लोकांना अटक केली आहे, तर अनेक लोक अजूनही त्यांच्या निशाण्यावर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com