
Goa News: 2024 वर्षाला बाय-बाय करत नव्या वर्षाचे आपण सर्वजण स्वागत करणार आहोत. डिसेंबर हा या वर्षातील शेवटचा महिना आहे. परंतु पुढच्या वर्षाबद्दल काहीतरी लक्षात आल्यानंतर लोकांनी चिंता व्यक्त करायला सुरुवात केलीय.
आपल्यापैकी बरेचजण नव्या वर्षाचा संकल्प काय करायचा याचा विचार करत असतील. तसेच, वर्षातील पहिल्या काही दिवसांचे नियोजन कसे करायचे याचा विचार करत असतील. हे नवे वर्ष संकल्पपूर्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी असावे असे प्रत्येकाला वाटते.
दरम्यान, नवीन वर्षाच्या कॅलेंडरमध्ये काही खास गोष्टी पाहिल्यानंतर काही लोक चिंतेत आहेत. 2025 वर्षाचा पहिला दिवस बुधवारपासून सुरु होत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात चुकीचे काय आहे? परंतु X वरील काही वापरकर्त्यांनी त्यामागील गमकाविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. नव्या वर्षाचे (2025) पहिले तीन दिवस बुधवार (1), गुरुवार (2) आणि शुक्रवार (3) आहेत. हे लोकांच्या फोन कॅलेंडरवर "WTF" म्हणून लिहिलेले दिसत आहेत.
एका X वापरकर्त्याने @wtffrio त्याच्या कॅलेंडरमध्ये याकडे निर्देश करणारा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. "2025 ची सुरुवात 'wtf' ने होईल याची आपल्याला काळजी वाटली पाहिजे का?" असे त्याने विचारले. त्याची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. ही अंदाजे 11 दशलक्ष वेळा पाहिले गेली. या माहितीवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. येत्या वर्षाबद्दल ते फारसे आशावादी नसल्याचे अनेकांनी सांगितले.
एकजण म्हणाला की, "प्रत्येक वर्ष गेल्या वर्षापेक्षा वाईट आहे. पण काही हरकत नाही." तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, "आपण आधीच उद्ध्वस्त झालो आहोत," आणखी एका वापरकर्त्याने लिहिले की, “आपल्याला काळजी वाटली पाहिजे.”
एका वापरकर्त्याने सांगितले की, 2020 वर्षातील पहिले तीन दिवस बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार होते. त्यावर्षी कोरोना महामारी आली. यावर एका वापरकर्त्याने लिहिले की, “आता मी चिंतेत आहे. शेवटच्या वेळी हे 2020 मध्ये घडले होते. ते वर्ष कसे गेले हे आपल्या सर्वांना माहीत आहे.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.