Pahalgam Terror Attack: कर्नाटकच्या मंत्र्यांचा युद्धासाठी हुंकार, म्हणाले, "मोदी-शाहांनी परवानगी दिली, तर पाकिस्तानात बॉम्ब घेऊन जाण्यास तयार"

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
B.Z. Zameer Ahmed Khan
B.Z. Zameer Ahmed KhanDainik Gomantak
Published on
Updated on

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, कर्नाटक सरकारमधील गृहनिर्माण व अल्पसंख्याक कल्याण मंत्री बीझेड झमीर अहमद खान यांनी एक मोठ विधान केलंय. त्यांनी शेजारील पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्याची आणि बॉम्ब घेऊन तिथे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना बीझेड झमीर अहमद खान म्हणाले, पाकिस्तान हा कायमचा भारताचा शत्रू राहिला आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला परवानगी दिली, तर मी युद्धासाठी पाकिस्तानात जाण्यास तयार आहे. मला आत्मघातकी बॉम्ब दिला गेला, तर मी तो अंगावर बांधून त्यांच्या देशात जाऊन हल्ला करीन.

त्यांनी पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत, त्याला "अमानवी आणि क्रूर" असे म्हटलं आहे. खान पुढे म्हणाले की, "हा हल्ला निष्पाप नागरिकांवर करण्यात आलेला घृणास्पद प्रकार आहे. प्रत्येक भारतीयाने आता एकत्र उभे राहणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेसाठी कठोर निर्णय घ्यावेत.

B.Z. Zameer Ahmed Khan
Goa Accidents: रस्ते अपघातांना लागणार ‘ब्रेक’, सरकारचे वाहतूक धोरण अधिसूचित; 3 वर्षांत 50% प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट

२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांच्या एका गटावर गोळीबार केला. या हल्ल्यात परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले. तपासात उघड झाले की, हल्लेखोरांनी हॉटेल्स आणि परिसराची रेकी करून ही कारवाई अंमलात आणली.

दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी पर्यटकांना धर्म ओळखण्यासाठी त्यांचे कपडे उतरवण्यास भाग पाडले. हिंदू ओळखल्या गेलेल्या पुरुषांवर थेट गोळीबार करण्यात आला. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी ठार मारण्यात आले.

B.Z. Zameer Ahmed Khan
Goa Stampede: शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू, 40 जण जखमी

या भयानक घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पाकिस्तानच्या विमान कंपन्यांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्यात आलं आहे.

त्यानंतर पाकिस्तानने देखील भारतासोबतचा व्यापार थांबवला असून, भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com